Delhi Crime : दिल्लीतील फॅक्ट्रीत 'लाकडी पेटीत' आढळले दोन बालकांचे मृतदेह; परिसरात खळबळ | पुढारी

Delhi Crime : दिल्लीतील फॅक्ट्रीत 'लाकडी पेटीत' आढळले दोन बालकांचे मृतदेह; परिसरात खळबळ

पुढारी ऑनलाइन डेस्क : Delhi Crime : दिल्लीतील जामीयानगर येथे एका फॅक्ट्रीत लाकडी पेटीत दोन बालकांचे मृतदेह आढळले. फॅक्ट्रीत काम करणाऱ्या मजूराने बालकांचे मृतदेह पहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बालकांची ओळख पटली आहे. दोन्ही मुले या फॅक्ट्रीत चौकीदार म्हणून काम करणाऱ्या बलबीर याची आहेत. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ही दोन्ही बालके सोमवारपासून बेपत्ता होती. यापैकी एकाचे वय 7 तर दुसऱ्याचे वय 8 वर्ष आहेत. दरम्यान दिल्ली पूर्व डिसीपीने सांगितले की प्राथमिक तपासणीत मुलांच्या शरीरावर कुठल्याही जखमांचे निशाण आढळलेले नाही. श्वास गुदमरल्याने दोघांचा जीव गेल्याचा अंदाज आहे. Delhi Crime

पोलिसांनी पुढे सांगितले की, Delhi Crime कदाचित ही मुले इथे येऊन लपली असतील मात्र ते कोणाच्या लक्षात आले नाही. लाकडी पेटी असल्याने मुलांचा श्वास गुदमरल्याची शक्यता आहे. दोन्ही मुले सोमवारी दुपारी मुलांनी आपल्या घरी जेवण केल्यानंतर 3.30 वाजल्यापासून ते बेपत्ता आहेत.

दरम्यान, आम्ही दोन्ही बालकांचे मृतदेह ताब्यात घेतले असून पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच मृत्यूचे कारण समजेल. घटनास्थळी एफएसएल आणि फॉरेंसिक टीमला पाचारण करण्यात आले आहे. टीमने घटनास्थळावरून नमुने गोळा गेले आहे. Delhi Crime

हे ही वाचा :

मुंबई : हार्बर मार्गावर रेल्‍वे वाहतूक विस्‍कळीत; चाकरमाण्यांचे हाल

Ukraine dam | युक्रेनमधील धरण क्षेपणास्त्र हल्ल्यात उद्ध्वस्त, हजारो लोक सुरक्षितस्थळी, पाहा व्हिडिओ

Back to top button