सांगलीत रिलायन्स ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा : गोळीबार करत दुकान लुटले, पलायनच्‍या प्रयत्‍नात ग्राहक जखमी | पुढारी

सांगलीत रिलायन्स ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा : गोळीबार करत दुकान लुटले, पलायनच्‍या प्रयत्‍नात ग्राहक जखमी

सांगली, पुढारी वृत्तसेवा : सांगलीतील रिलायन्स ज्वेलर्सवर आज ( दि. ४ ) भरदिवसा सशस्त्र दरोडा पडला. दराेडेखाेरांनी गोळीबार करत अख्खे दुकान लुटले. दरोडेखोरांनी दुकानातील कर्मचाऱ्यांना बांधून घातले. संपूर्ण दुकान लुटून गोळीबार करत दरोडेखोर पसार झाले. या फिल्मी स्टाईल दरोड्यांनी सांगली जिल्हा हदरला आहे.

झाड तोडण्यासाठी रस्ता बंद केल्याचा घेतला फायदा

सांगली -मिरज रस्त्यावर रिलायन्स ज्वेलर्सचे दुकान आहे. या रस्त्यावरील एक झाड आज दुपारी तोडण्यात येत होते. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्‍यात आला होता. त्याचा फायदा घेत सहा ते सात जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीने दरोडा टाकला.

दरोडेखोरांनी दुकानातील कर्मचाऱ्यांना बांधून घातले.  दुकानातील सर्व सोने आणि हिरे लुटले आहेत. या वेळी एका ग्राहकाने दुकानातून पलायन करण्‍याचा प्रयत्‍न केला. यावेळी ग्राहकाच्‍या दिशेने दरोडेखोरांनी  गोळीबार केला. ताे थाोडक्‍यात बचावला. मात्र शाोरुमच्‍या तळमजल्‍यामध्‍ये पडून जखमी झाला आहे. दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी श्वानपथक पाचारण करण्यात आले; परंतु दुकानाबाहेर श्वान घुटमळले. दरम्यान, दरोडेखोरांच्या मागावर स्थानिक गुन्हे अन्वेषणची पथक रवाना करण्यात आली आहेत.

 

Back to top button