सौरव गांगुलीच्या बायोपिक आयुष्यमान साकारणार | पुढारी

सौरव गांगुलीच्या बायोपिक आयुष्यमान साकारणार

टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या जीवनावर चित्रपट बनवला जाणार, अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. सौरवने बायोपिकच्या स्क्रिप्टला मंजुरी दिल्याने लवकरच या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. बायोपिकची घोषणा झाल्यावर सुरुवातीला अभिनेता रणबीर कपूर हा सौरवची भूमिका साकारणार होता, परंतु आता काही कारणास्तव चित्रपटात रणबीरऐवजी आयुष्मान खुरानाची वर्णी लागणार आहे. चित्रपटाचे निर्माते सध्या आयुष्मानबरोबर याबाबत चर्चा करीत असल्याची माहिती समोर आली आहे. सौरवने चित्रपटाच्या निर्मात्यांना आयुष्मानला मोठ्या पडद्यावर त्याची भूमिका साकारण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला असून दोघेही या संदर्भात लवकरच भेट घेणार आहेत.

Back to top button