NIA Raids : 'PFI ने रचलेल्या पंतप्रधान मोदींच्या हत्येच्या कट' प्रकरणी कर्नाटकात NIA चे 16 ठिकाणी छापे | पुढारी

NIA Raids : 'PFI ने रचलेल्या पंतप्रधान मोदींच्या हत्येच्या कट' प्रकरणी कर्नाटकात NIA चे 16 ठिकाणी छापे

पुढारी ऑनलाइन डेस्क : NIA Raids : PFI (पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया) कडून 20222 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणातील पुढील तपासासंदर्भात NIA (राष्ट्रीय तपास यंत्रणा) ने कर्नाटकात छापे टाकले आहेत. आज बुधवारी पहाटे कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील 16 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले आहे. प्रतिबंधित PFI संघटनेशी संबंधित ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात आली आहे. याशिवाय केरळ आणि बिहार या राज्यांमध्येही एनआयएने 9 ठिकाणी छापे टाकले आहेत.

एनआयएचे अधिकारी दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बेलतांगडी, पुत्तूर, बांटवाला, उप्पिनगडी आणि वेनुरासह 16 ठिकाणी छापे टाकत आहेत. हे छापे बंदी घातलेल्या PFI संघटनेच्या 12 जुलै 2022 रोजी बिहारमधील रॅलीत पंतप्रधान मोदींवर हल्ला करण्याच्या कटाच्या चौकशीचा भाग आहेत.

NIA Raids : चार संशयित ताब्यात

NIA सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिकारी स्थानिक पोलिसांच्या मदतीने 16 ठिकाणी कागदपत्र पडताळणी करत आहेत. बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या कार्यकर्त्यांशी संबंधित घरे, कार्यालये आणि रुग्णालये एकाच वेळी मंगळुरू तसेच पुत्तूर, बेलतांगडी, उप्पिनगाडी, वेणूर आणि बंटवाल येथे झडती घेण्यात आली.

एनआयएने पुत्तूर, कुर्नाडका, तारिपडपू आणि कुंब्रा गावातून चार संशयितांना ताब्यात घेतले. मोहम्मद हरीस कुंब्रा, सज्जाद हुसेन कोडंबडी, फैजल अहमद तारिगुड्डे आणि समशुद्दीन कुर्नाडका अशी संशयितांची नावे आहेत.

NIA Raids : काय आहे संपूर्ण प्रकरण

PFI या बंदी घातलेल्या संघटनेवर अंमलबजावणी संचलानयाने (ईडी) गेल्या पीएफआय सदस्य शफीक पायथ यांच्याविरुद्धच्या रिमांड नोटमध्ये म्हटले होते की, पीएफआयने 12 जुलै 2022 रोजी बिहारच्या पटना रॅलीत पंतप्रधान मोदींना लक्ष्य करण्याचा कट रचला होता. शिवाय, ईडीने दावा केला होता की पीएफआय दहशतवादी मॉड्यूल आणि इतर हल्ले तयार करत आहे.

NIA Raids : आखाती देशांकडून हवाला मार्गे पैसे मिळत असल्याचा आरोप

भारतात दहशतवादी कारवायांचा कट रचण्यासाठी पीएफआयला आखाती देशांकडून पैसे मिळाल्याचा आरोप आहे. हे छापे दक्षिण भारतातील पीएफआय हवाला मनी नेटवर्कवर कारवाई करण्याचा प्रयत्न आहे.

दक्षिण कन्नडमध्ये त्यांचे नेटवर्क असण्याची शक्यता एनआयएच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे, म्हणूनच एनआयए अधिकार्‍यांचे एक पथक तपासाच्या मार्गावर दक्षिण कन्नड जिल्ह्यात एनआयएकडून ही छापेमारी करण्यात आली आहे.

NIA Raids : पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट प्रकरणी 2022 मध्ये 5 जणांना अटक

गेल्या वर्षी 2022 मध्ये फुलवारी शरीफ परिसरात छापे टाकल्यानंतर देशविरोधी कारवायांमध्ये गुंतल्याबद्दल पटनामध्ये पाच जणांना अटक करण्यात आली होती. छाप्यांमध्ये PFI च्या ‘मिशन 2047’ यासह अनेक दोषी कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या रडारवर आहेत, असे म्हटले आहे.

हे ही वाचा :

NIA Raids : PFI फुलवारी शरीफ प्रकरणी NIA चे ३ राज्यात २५ ठिकाणी छापे

NIA Raid : मध्य प्रदेशातील जबलपूर येथे NIA ची १३ ठिकाणी छापेमारी; अनेक ठिकाणे सील

Back to top button