Chinese Sailors Died : पिवळ्या समुद्रात चिनी पाणबुडी आपल्याच ट्रॅपमध्ये अडकली, 55 खलाशांचा मृत्यू

Chinese Sailors Died : पिवळ्या समुद्रात चिनी पाणबुडी आपल्याच ट्रॅपमध्ये अडकली, 55 खलाशांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : पिवळ्या समुद्रात आण्विक पाणबुडी अडकल्याने तब्बल 55 चिनी खलाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिररने दिलेल्या वृत्तानुसार परदेशी जहाजांसाठी तयार केलेल्या सापळ्यात ही पाणबुडी अडकल्याने ही दुर्घटना घडली असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पिवळ्या समुद्रात ब्रिटीश जहाजांसाठी लावलेल्या सापळ्यामध्ये चिनीची आण्विक पाणबुडी अडकल्याने जवळपास 55 खलाशांचा मृत्यू झाला. ब्रिटीश गुप्तचर विभागातील सूत्रांच्या हवाल्याने आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे. युकेच्या गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जहाजांसाठी लावलेल्या सापळ्यातील साखळी आणि अँकरला लागल्याने ही पाणबुडी अडकली. यामध्ये एकूण 55 चिनी खलाशी मृत्यूमुखी पडले. कॅप्टन जू योंग-पेंग आणि 21 अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश होता.

यूकेच्या अहवालात या मोहिमेबाबत माहिती दिली आहे. यामध्ये सांगितले आहे की "21 ऑगस्ट रोजी, पिवळ्या समुद्रात स्थानिक वेळेनुसार 08:12 वाजता एक ऑनबोर्ड अपघात झाला, परिणामी 22 अधिकारी, 7 अधिकारी कॅडेट, 9 कनिष्ठ अधिकारी, 55 क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला. अधिकारी आणि 17 खलाशी. मृतांमध्ये कॅप्टन कर्नल झ्यू योंग-पेंग यांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news