Earthquake : नेपाळमध्ये भूकंपाचे दोन वेळा धक्के | पुढारी

Earthquake : नेपाळमध्ये भूकंपाचे दोन वेळा धक्के

पुढारी ऑनलाइन डेस्क : Earthquake : नेपाळमध्ये गुरुवारी रात्री भूकंपाचे दोन वेळा धक्के जाणवले. नेपाळच्या बाजुराच्या डहाकोटमध्ये 4.8 आणि 5.9 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. राष्ट्रीय भूविज्ञान केंद्राने ट्विट करून याची माहिती दिली.

Earthquake : नेपाळच्या सुर्खेत जिल्ह्यातील भूकंप विज्ञान केंद्राच्या अधिकाऱ्यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, पहिला भूकंप रात्री 11.58 वाजता (स्थानिक वेळेनुसार) 4.9 इतक्या तीव्रतेचा झाला. तर रात्री 1.30 वाजता दुसरा भूकंप 5.9 तीव्रतेचा नोंदवला गेला.

Back to top button