5-Gमुळे भारत असा बदलेल

5-Gमुळे भारत असा बदलेल
Published on
Updated on

सुयश जाधव, ऋग्वेद जक्का (अल्‍गोस्‍मिक, पुणे) 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ५ जी स्पेक्ट्रमसाठी लिलाव लवकरच होतील अशी घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. ५जी तंत्रज्ञानाचा फार मोठे लाभ भारताला होणार आहेत. डिजिटल युनिव्हर्सिटी, ५जीची इकोसिस्टम उभारण्यासाठी PLI योजनेचा लाभ आणि Universal Obligation Fund मधून ५ टक्के निधी तंत्रज्ञानाच्या व्यवसायिकीकरणासाठी आणि संशोधन आणि विकासासाठी राखीव ठेवणे या फार मोठ्या घोषणा आहेत. देशातील एकूण डिजिटलसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभ्या राहाण्याच्या दिशेने आपण वेगाने वाटचाल करत आहोत, असे म्हणता येईल.

५जी हे तंत्रज्ञान म्हणून वेगळे आहे, हे आधी लक्षात घेतले पाहिजे. यामुळे फक्त इंटरनेटचा वेग वाढणार आहे, असे नाही तर इतरही बरेच तांत्रिक बदल होणार आहेत.

५जी ऊर्जास्नेही आहे, म्हणजेच ऊर्जेची मोठी बचत या तंत्रज्ञानामुळे होणार आहे. ५जीचे ट्रान्समिशन अतिशय इंटेलिजन्स आणि अचूक असते. याची क्षमता एका चौरस किलोमीटरसाठी १० लाख डिव्हाईस इतकी प्रचंड आहे. त्यामुळे Network Congestion ही जी आपल्या देशातील सर्वांत मोठी समस्या आहे, ती राहणार नाही.

५जीमध्ये नेटवर्कमध्ये प्रोसेसिंगची क्षमात असते. त्यामुळे गेमिंग, AR- Filter अशा सेवा ५ जी मध्ये फार चांगल्या प्रकारे मिळतील. सध्या अशा सेवांचे प्रोसेसिंग जे मोबाईलवर होते, ते नेटवर्कमध्येच होईल, त्यामुळे या सेवांची गुणवत्ता वाढलेली असेल.

वर्क फ्रॉम होम, रोबोटिक्स, ऑनलाईन एज्युकेशन आणि आरोग्य व्यवस्था यात अमुलाग्र असे बदल ५जीमुळे होणार आहेत. आरोग्य सेवेत फार सकारात्मक बदल ५जी तंत्रज्ञान घडवणार आहे. रिमोट सर्जरी, रुग्णवाहिका पोहोचण्यापूर्वी  रुग्णाला प्रथमोपचार देणे अशा सेवा सुरू होतील. देशातील आणि परदेशातील नामवंत संस्थांमधील तज्ज्ञ प्राध्यापकांचे व्हिडिओच्या माध्यामातून व्याख्याने अगदी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील.

डिजिटल तंत्रज्ञानाचा औद्योगिक वापर फार मोठ्या प्रमाणावर वाढेल. 

Internet of Things साठी ५जी तंत्रज्ञान उपयुक्त आहे. कमी ऊर्जा लागत असल्याने जी उपकरणं कमी ऊर्जेवर चालणारी आहेत तीही Internet of Things ला कनेक्ट होऊ शकतील.

ॲडव्हान्स रोबोटिक्स आणि बिग डेटा ॲनॅलिसिसला मोठी गती मिळाल्याने Industry 4.0 भारतात वेगाने आकार घेईल.
५जी मुळे स्मार्ट सिटी प्रत्यक्षात येतील. उदा. ट्रॅफिक नियंत्रणासाठी स्मार्ट यंत्रणा देशात शक्य होतील. डिजिटल बँकिंग, फिनटेक यासाठी ५जी उपयुक्त ठरणार आहे. डिजिटल बँकिंगला गती येईल.

रिझर्व्ह बँक डिजिटल करन्सी घेऊन येत आहे. याला कालसुसंगत निर्णय म्हणावा लागेल. मेटाव्हर्स, अग्युमेंटेड रिअॅलिटी यासाठी सुसंगत ठरणारे चलन असणे आवश्यक होते, ते या निर्णयामुळे मिळत आहे. आपला रुपया नव्या जगासाठी तयार होत आहे, असे म्हणता येईल.

पण हे होत असताना तंत्रज्ञानाचा चांगला उपयोग कसा करायचा हेही लोकांना शिकवावे लागेल, तसेच तंत्रज्ञानातील या बदलाला पुरक ठरेल असे मनुष्यबळही निर्माण करावे लागेल. सायबर सुरक्षा हा जास्त कळीचा मुद्दा बनलेला आपल्याला दिसून येईल, त्या दृष्टीनेही आपली तयारी असावी लागणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news