Mahatma Gandhi : महात्मा गांधींच्या शैक्षणिक पात्रतेवरील सिन्हा यांच्या 'त्या' वक्तव्याला तुषार गांधी यांचे उत्तर

पुढारी ऑनलाइन डेस्क : जम्मू काश्मीरचे नायाब राज्यपाल (लेफ्टनंट गव्हर्नर) मनोज सिन्हा यांनी गुरुवारी ग्वाल्हेर येथे महात्मा गांधी (Mahatma Gandhi) केलेल्या वक्तव्यावरून नवीन वादाला तोंड फोडले आहे. सिन्हा यांनी महात्मा गांधी यांच्याकडे विद्यापीठाची एकही पदवी नव्हती, मग कायद्याची पदवी तर सोडूनच द्या. त्यांच्याकडे केवळ हायस्कूलचा डिप्लोमा होता, अशी टिप्पणी केली होती. त्यांच्या या टिप्पणीवर अनेक स्तरांतून टीका करण्यात येत आहे. खूद्द महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी देखील या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
गुरुवारी ग्वाल्हेर येथे एका कार्यक्रमात बोलताना सिन्हा यांनी पदवी असणे म्हणजे शिक्षित असणे आवश्यक नाही हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न करताना म्हणाले: “गांधीजी (Mahatma Gandhi) अशिक्षित होते असे कोणी म्हणू शकेल असे मला वाटत नाही. पण त्यांच्याकडे विद्यापीठाची एकही पदवी किंवा पात्रता नव्हती हे तुम्हाला माहीत आहे का? महात्मा गांधींकडे (Mahatma Gandhi) कायद्याची पदवी होती, असे आपल्यापैकी बरेच जणांना माहीत आहे. मात्र, त्यांनी ती पदवी घेतलेली नव्हती. तर हायस्कूल डिप्लोमा ही त्यांची एकमेव पात्रता होती. मात्र, ते कायद्याचा सराव करण्यास पात्र होते पण त्यांच्याकडे पदवी नव्हती. तरीही पाहा ते किती शिक्षित होते. ते राष्ट्रपिता झाले.
तुषार गांधींनी केला फोटो शेअर (Mahatma Gandhi)
त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, तुषार गांधींनी महात्मा गांधीजींच्या आत्मचरित्राचा एक फोटो ट्विट केला आणि म्हटले: “मी बापूंच्या आत्मचरित्राची एक प्रत जम्मू राजभवनाला पाठवली आहे. ही प्रत जर L-G सिंह वाचू शकले तर ते स्वतःला शिक्षित करतील.”
“महात्मा गांधी यांनी अभ्यास करून आणि परीक्षा उत्तीर्ण करून, इनर टेंपलमधून कायद्याची पदवी संपादन केली. लंडन युनिव्हर्सिटीशी संलग्न कॉलेज आणि त्याचवेळी लॅटिन आणि फ्रेंच भाषेत दोन डिप्लोमा त्यांनी केले होते.” असे तुषार गांधी यांनी म्हटले आहे.
तुषार गांधी म्हणाले, एक पत्रकाराने मला कॉल केला आणि विचारले, “जम्मू आणि काश्मीरच्या नायब राज्यपालांनी तुमच्या पंजोबांच्या पात्रतेबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे, कृपया स्पष्ट करा.” असे लिहित त्यांनी ‘पत्रकारितेचा दयनीय दर्जा, आणि तितकेच दयनीय राज्यपालही!’ अशा शब्दांत त्यांनी खंत व्यक्त केली.
I have dispatched a copy of Bapu’s Autobiography to Rajbhavan Jammu with the hope that if the Deputy Governor can read he will educate himself. pic.twitter.com/YzPjyi8b1f
— Tushar (@TusharG) March 24, 2023
हे ही वाचा :