Stock Market Today : भारतीय बाजाराची नकारात्मक सुरुवात; निफ्टी, सेन्सेक्स आणि बँक निफ्टीत मोठी घसरण | पुढारी

Stock Market Today : भारतीय बाजाराची नकारात्मक सुरुवात; निफ्टी, सेन्सेक्स आणि बँक निफ्टीत मोठी घसरण

पुढारी ऑनलाइन डेस्क : Stock Market Today : भारतीय बाजाराची सुरुवात गुरुवारी पुन्हा नकारात्मक निर्देशांकात झाली. गुरुवारी, NSE निफ्टी 50 73.80 पॉईंट्स किंवा 0.43% घसरून 17,078.10 वर आणि BSE सेन्सेक्स 253.54 पॉइंट्स किंवा 0.44% घसरून 57,961.05 वर आला. त्यानंतर घ्या तासाभरात सेन्सेक्स 350 अंकांपर्यंत खाली आहे.

बाजार उघडल्यानंतर आज निफ्टी मार्केटमध्ये आज हेरो मोटोकॉर्प, लार्सन अँड टुब्रो, भारती एअरटेल, टाटा मोटर्स आणि सन फार्मा हे टॉप गेनर्स होते तर अदानी एंटरप्रायझेस, एशियन पेंट्स, आयशर मोटर्स, एचडीएफसी आणि पॉवर ग्रिड हे टॉप लूजर्स होते.

केंद्र सरकारच्या घोषणेनंतर HAL चे शेअर्स घसरले

केंद्र सरकार ऑफर फॉर सेल (OFS) द्वारे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) मधील 3.5% पर्यंत हिस्सा विकणार आहे. OFS साठी फ्लोअर प्राइस 2,450 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. परिणामी हिंदुस्तान एरॉनॉटिक लिमिटेडचे स्टॉक 6 टक्क्यांनी घसरले. Stock Market Today

अडाणी ग्रुपमध्ये अडाणी ग्रीनचे शेअर्स आज 5 टक्क्यांनी वधारले आहेत. याशिवाय डॉलरच्या तुलनेत रुपया अधिक मजबूत झाला आहे. सुरुवातीच्या व्यापारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 22 पैशांनी वाढून 82.37 वर पोहोचला आहे.

फेडरल रिझर्व्हने चलनवाढीविरुद्धच्या लढ्याचा पुनरुच्चार केल्यावर आणि यूएस ट्रेझरी सेक्रेटरींनी सर्व बँकिंग ठेवींचा विमा उतरवण्याचे संकेत दिल्याने, गुरूवारी आयटी समभागांच्या नेतृत्वाखाली भारतीय समभागांची विक्री कमी झाली. 13 प्रमुख क्षेत्रीय निर्देशांकांपैकी आठ उच्च वेटेज वित्तीय आणि माहिती तंत्रज्ञान (IT) समभागांमध्ये अनुक्रमे 0.5% आणि 1% घसरले. आयटी निर्देशांकातील सर्व 10 घटकांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती विश्लेषकांनी दिली आहे. Stock Market Today

हे ही वाचा :

AI Girlfriend : ‘एआय’ गर्लफ्रेंडचा जगाला लळा

Expensive Flat : २५२ कोटींचा देशातील सर्वांत महागडा फ्लॅट! जाणून घ्या मुंबईतील चर्चेतील व्यवहार

Stock Market Today : गुढी पाडव्याला बाजारात तेजी; सेन्सेक्स, निफ्टीची सकारात्मक सुरुवात

Back to top button