Sukesh Chandrashekhar : महाठग सुकेश चंद्रशेखरला करायचे आहे 'महादान'! डीजींना पाठवले पत्र | पुढारी

Sukesh Chandrashekhar : महाठग सुकेश चंद्रशेखरला करायचे आहे 'महादान'! डीजींना पाठवले पत्र

पुढारी ऑनलाइन डेस्क : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी दिल्लीच्या मंडोली कारागृहात बंद असलेला महाठग सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पण यावेळी तो कोणत्याही आरोपांमुळे चर्चेत आलेला नाही. किंवा जॅकलिन सोबतच्या त्याच्या नात्यामुळेही सध्या तो चर्चेत नाही. तर या महाठग सुकेशला आता महादान करायचे आहे. यासाठी त्याने जेलच्या डीजींना पत्र लिहिले आहे.

सुकेशने (Sukesh Chandrashekhar) डीजींना लिहिलेल्या या पत्राने तो पुन्हा चर्चेत आला आहे. त्याचे हे पत्र व्हायरल झाले आहे. सुकेशला त्याच्या वाढदिवसानिमित्त महादान करायचे आहे. येत्या 25 मार्चला त्याचा वाढदिवस आहे. आपल्या वाढदिवशी त्याने तुरुंगातील गरीब कैद्यांना दान करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे. यासाठी त्याने स्वतः पत्र लिहून डीजी ला सांगितले आहे. पत्रात त्याने म्हटले आहे की त्याच्या वाढदिवसानिमित्त 25 मार्च रोजी जे गरीब कैदी जामिनाची रक्कम भरू शकत नाही अशा सहकारी कैद्यांना मदत म्हणून 5 कोटी 11 लाख रुपये द्यायचे आहेत.

सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) हा 200 कोटीच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी दिल्लीच्या मंडोली कारागृहात बंद आहे. याप्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांच्यावरही आरोप ठेवण्यात आले होते. मात्र, नंतर त्यांना या प्रकरणातून क्लिन चीट मिळाली.

हे ही वाचा :

Actress Gudhi Padwa : नाकात नथ, केसात गजरा; नटल्या मराठमोळ्या अभिनेत्री

एका चेहर्‍यावर अनेक चेहरे…अमृतपाल सिंगचे फोटो पोलिसांकडून जारी

Back to top button