मुंबई ; माटुंगा लेबर कॅम्प मध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट; ५ घरांचे छप्पर उडाले

पुढारी वृत्तसेवा : माटुंगा लेबर कॅम्प मधील आनंद नगर मध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यामध्ये 4 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटणेत पाच दुकाने भुईसपाट झाली आहेत. हा स्फोट इतका मोठा होता की, एका शौचालयासह पाच घराचे छप्पर उडाले. ही दुर्घटणा आज (रविवार) मध्य रात्रीच्या सुमारास घडली.