Saba Azad : कंगनाची स्वस्त कॉपी

पुढारी ऑनलाईन : अभिनेता हृतिक रोशन आणि सबा आझाद एकमेकांना डेट करत आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. अलीकडच्या एका कार्यक्रमातील दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात सबाच्या लुकवरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. हृतिक आणि सबाने वेब सीरिज ‘रॉकेट बॉईज २’ च्या स्क्रीनिंगला हजेरी लावली होती. सबादेखील या सीरिजमध्ये झळकणार आहे. अशातच स्क्रीनिंमधील दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
यावर यूजर्स प्रतिक्रिया देत आहेत. काही यूजर्सनी सबाला कंगनाची स्वस्त कॉपी म्हटले आहे. कंगना आणि हृतिकमधील वाद सर्वानाच माहीत आहे. कंगनाने हृतिकबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा केला होता, तर हृतिकने मात्र, हे वृत्त फेटाळले होते. त्यानंतर त्यांनी एकमेकांविरोधात तक्रारी दिल्या होत्या, तसेच माध्यमांसमोरही आरोप-प्रत्यारोप केले होते. अशातच हृतिकची गर्लफ्रेंड मात्र, कंगनाची स्वस्तातली कॉपी असल्याचे म्हणत नेटकऱ्यांनी हृतिकलाही ट्रोल केले आहे. ‘हिच्यापेक्षा कंगना छान होती’, ‘कंगना – २.०’ अशा प्रतिक्रिया यूजर्सनी दिल्या आहेत.