Sanjay Raut : शिंदे गटाचा आनंद औट घटकेचा ठरेल – संजय राऊत | पुढारी

Sanjay Raut : शिंदे गटाचा आनंद औट घटकेचा ठरेल - संजय राऊत

पुढारी ऑनलाइन डेस्क : निवडणूक आयोगाचा निर्णय हा घटना बाह्य असून आयोगाने दबावाखाली निर्णय घेतला आहे. शिंदे गटाचा आनंद औट घटकेचा ठरेल, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे गटाने आज तातडीची बैठक बोलावली. यावेळी राऊत बोलत होते.

यावेळी बोलताना राऊत म्हणाले, अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात सुरू असतानाच निवडणूक आयोगाने निर्णय दिला. आयोगाने वस्तूस्थितीचे भान न ठेवता हा निर्णय दिला आहे. तसेच आज सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत घटनापीठाने केलेली टिप्पणी योग्य आहे, न्यायालयाने योग्य मुद्दा निवडला आहे, असे म्हटले आहे.

सत्ता संघर्ष सुनावणी प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दहाव्या सूचीनुसार अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार अध्यक्षांनाच कोर्टाचा हस्तक्षेप चालणार नाही, असे घटनापीठाने आज स्पष्ट केले आहे. याबाबत बोलताना राऊत म्हणाले, न्यायालयाने हा योग्य मुद्दा निवडला आहे.

तसेच, निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. याचिकेत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय देण्याची मागणी केली आहे. आमचा न्यायालयावर विश्वास आहे, असे म्हणत शिंदे गटाचा आनंद औट घटकेचा ठरेल. तसेच त्यांची दादागिरी खूप दिवस चालणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

याशिवाय निवडणूक आयोगाने जिला शिवसेना म्हटले आहे तिला आम्ही शिवसेना मानत नाही. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख हे उद्धव ठाकरे हेच आहेत, याचा संजय राऊत यांनी पुनरुच्चार केला आहे.

हे ही वाचा :

भगतसिंह कोश्यारी खोटं बोलतायत; त्‍यांनी घटनात्‍मक कर्तव्य का पाळलं नाही? : संजय राऊत

खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल

Back to top button