Mahashivratri : महाशिवरात्री विशेष : 'शिवपंचाक्षरी स्तोत्राचे महत्व' | पुढारी

Mahashivratri : महाशिवरात्री विशेष : 'शिवपंचाक्षरी स्तोत्राचे महत्व'

पुढारी ऑनलाइन डेस्क : Mahashivratri : महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील मोठा सण आहे. या दिवशी शिवाची विशेष उपासना केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी धारणा आहे. महाशिवरात्री हे खूप मोठे पर्व आहे. यावेळी आपल्या वेगवेगळ्या इच्छापूर्तींसाठी शिवाच्या वेगवेगळ्या रुपांची पूजा -साधना केली जाते. मात्र अनेक जणांना आपल्या कोणत्या इच्छेसाठी शिवाच्या कोणत्या रुपाची पूजा-साधना करावी हे माहित नसते. अशा परिस्थितीत शिवाच्या बीजमंत्रासह शिवपंचाक्षरी स्तोत्राचा पाठ केल्याने आपल्या इच्छा पूर्ण होतात. कारण शिवपंचाक्षरी स्तोत्राला इच्छापूर्तीचा खजिना मानला गेला आहे.

Mahashivratri : बीजमंत्र म्हणजे काय?

हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार कोणत्याही देवतेच्या साधनेसाठी मंत्रपठण अतिशय महत्वाचे मानले केले आहे. धार्मिक मान्यतेनुसार मंत्र हा शब्द तीन शब्दांचे एकत्रीकरण आहे. म म्हणजे मन, अंतःकरण आणि त्र म्हणजे पूर्तता करणे. थोडक्यात मनाला किंवा अंतःकरणाला आध्यात्मिक उंचीवर नेऊन पूर्णत्वास नेणे. मंत्राचे अनेक प्रकार असतात. अनेक वेळा मंत्र हे मोठ-मोठे असतात अशावेळी प्रत्येक देवतेसाठी तयार केलेल्या मंत्राचे जे मूळ असते किंवा जो गाभा असतो त्याला बीजमंत्र म्हटले आहे. प्रत्येक दैवताचा बीजमंत्र हा त्या दैवताचा आविष्कार मानला जातो. शिवशंकराचा बीजमंत्र ‘हिृम्’ असा आहे. तर काही साधक ‘हुं’ हा देखील शिवाचा बीजमंत्र मानतात. दोन्हींचे दोन वेगवेगळे वैशिष्ट्य आहे. हिृम मध्ये ऐहिक माया नष्ट करण्याची क्षमता आहे तर हुं मध्ये जागृती चेतवण्याची क्षमता असते. त्यामुळे शिवाच्या उपासनेसाठी ‘ओम हिृम क्रीं हुं श्रीं’ हा शिव उपासनेसाठी उत्तम मंत्र मानला जातो.

Mahashivratri : शिवपंचाक्षरी स्तोत्र

शिवसाधनेमध्ये शिवपंचाक्षरी स्तोत्र याला अनन्य साधारण महत्व आहे. मनुष्याचे संपूर्ण जीवन हे त्याच्या इच्छाशक्ती आणि कार्यशक्तीवर अवलंबून असते. त्यामुळे आपली इच्छाशक्तीला योग्य मार्ग मिळवून देणे. तसेच आपल्या इच्छापूर्तींसाठी शिवपंचाक्षरी स्तोत्र खूप प्रभावी आहे. महाशिवरात्रीला शिव-शंभूंना प्रसन्न करून घेऊन आपल्या आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी शिवपंचाक्षरी स्तोत्र खूप प्रभावी मानले गेले आहे. या स्तोत्रामुळे आयुष्यातील सर्व नकारात्मक प्रभाव नष्ट होऊन मन सकारात्मक होते. आयुष्यात येणारी संकटे दूर होऊन जीवनात सुख-समृद्धी प्राप्त होते.

नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय।
नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मे न काराय नम: शिवाय:।।

मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय।
मंदारपुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मे म काराय नम: शिवाय:।।

शिवाय गौरी वदनाब्जवृंद सूर्याय दक्षाध्वरनाशकाय।
श्री नीलकंठाय वृषभद्धजाय तस्मै शि काराय नम: शिवाय:।।

वशिष्ठ कुभोदव गौतमाय मुनींद्र देवार्चित शेखराय।
चंद्रार्क वैश्वानर लोचनाय तस्मै व काराय नम: शिवाय:।।

यज्ञस्वरूपाय जटाधराय पिनाकस्ताय सनातनाय।
दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै य काराय नम: शिवाय:।।

पंचाक्षरमिदं पुण्यं य: पठेत शिव सन्निधौ।
शिवलोकं वाप्नोति शिवेन सह मोदते।।

नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय।
नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मे ‘न’ काराय नमः शिवायः।।

(वरील माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे पुढारी ऑनलाइन त्याची हमी घेत नाही.)

Mahashivratri 2023 : त्र्यंबकेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त जय्यत तयारी

Back to top button