Stock Market Today : बाजार घसरला, सेन्सेक्स 250 अंक तर निफ्टी 17850 च्या खाली, जाणून घ्या स्टॉक मार्केटचा आजचा मूड | पुढारी

Stock Market Today : बाजार घसरला, सेन्सेक्स 250 अंक तर निफ्टी 17850 च्या खाली, जाणून घ्या स्टॉक मार्केटचा आजचा मूड

पुढारी ऑनलाइन डेस्क : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात आज पुन्हा नकारात्मक लाल निर्देशांकानी झाली. गुरुवारी संघर्ष केल्यानंतर भारतीय बाजाराच्या आजच्या दिवसाची सुरुवात देखील नकारात्मक झाली. अवघ्या तासाभरात निफ्टी 17850 च्या खाली आला तर सेन्सेक्स 250 अंकांनी घसरला.

बाजारातील आज सकाळचे टॉप गेनर्स आणि लॉसर्स

सेन्सेक्समध्ये महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, आयटीसी, लार्सन अँड टुब्रो आणि बजाज फायनान्स हे सर्वाधिक नफा मिळवणारे आहेत, एलआयसीचे शेअर्स 2 टक्क्यांनी वाढले. तर कालपर्यंत वधारलेले झोमॅटोच्या शेअर्स बाजाराच्या सुरुवातीलाच 4 टक्के घसरले. या व्यतिरिक्त एचसीएल टेक, टाटा स्टील, इन्फोसिस, विप्रो आणि टेक महिंद्रा यांना नुकसान झाले आहे.

बँक निफ्टी 41,500 च्या खाली घसरला

गुरुवार पासून सुरू असलेली बँक निफ्टीची घसरण अजूनही कायम आहे. बँक निफ्टी 60.35 अंक किंवा 0.15% घसरून 41,493.95 वर आला. निर्देशांकात सर्वाधिक लाभधारक AU बँक, बँक ऑफ बडोदा, PNB, Axis बँक आणि कोटक बँक आहेत. तर ICICI बँक, IDFC फर्स्ट बँक, IndusInd बँक, SBIN आणि HDFC बँक तोट्यात आहेत.

MSCI च्या फ्लोट कटिंगनंतर अदानी समूहाचे शेअर्स कोसळले

MSCI च्या घोषणेनंतर अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागांच्या किमतीत लक्षणीय घसरण झाली. MSCI ने Adani Enterprises Ltd., Adani Transmission Ltd., Adani Total Gas Ltd., and ACC Ltd. च्या फ्री फ्लोटमध्ये बदल करण्याची आपली योजना जाहीर केली आहे. हे बदल 28 फेब्रुवारी रोजी लागू केले जातील.

हे ही वाचा :

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचे फेसबुक आणि इन्स्टाग्राम पुन्हा सुरु

Isro SSLV rocket Launch : तीन उपग्रहांसह इस्रोच्या SSLV रॉकेटचे श्रीहरिकोटा येथून उड्डाण

Back to top button