ST Bus : शिवाईला हिरव्या रंगाचा साज, एसटी महामंडळाचा निर्णय | पुढारी

ST Bus : शिवाईला हिरव्या रंगाचा साज, एसटी महामंडळाचा निर्णय

मुंबई : पुढारी वृत्तसेवा, पर्यावरणाच्या रक्षणासाठी ताफ्यात येणाऱ्या इलेक्ट्रिक बसच्या (शिवाई) रंगसंगतीमध्ये बदल करण्याचा निर्णय एसटी ST Bus महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार मार्च महिन्यापासून मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या शिवाईवर हिरव्या रंगामधील छटा पहायला मिळणार आहेत.

ST Bus : इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने विशेष धोरण तयार केले आहे. त्यानुसार केंद्र सरकारतर्फे सार्वजनिक वाहतुक महामंडळांना इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी सबसिडी देण्यात येते. फेम २ अंतर्गत एसटी महामंडळाच्या ताफ्यात १०० इलेक्ट्रिक बस मार्च महिन्यापर्यंत दाखल होणर आहेत. त्यापैकी दोन बस सध्या पुणे-अहमदनगर मार्गावर धावत आहे. पांढरा, भगवा, जांभळा आणि हिरव्या रंगाचा वापर करून सध्याची शिवाई धावत आहे. या गाडीवर आता हिरव्या रंगाच्या पुसट गडद छटा रंगवण्यात येणार आहेत.

ST Bus : हिरवा रंग का

एसटीच्या रंगसंगतीमध्ये बदल करण्याचे किंवा रंग बदलण्याचे अधिकार महामंडळाला आहे. शिवाई ही हरित ऊर्जेवर धावणारी असल्याने हिरवा रंग निवडण्यात आला आहे.

ST Bus : शिवाईकडे आकर्षित करण्यासाठी निम आरामचे दर

शिवाईकडे प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी सुरुवातीला या बसचे तिकिट दर निम आराम बसच्या दराप्रमाणे आकारण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना किफातशीर दरात आरामदायी प्रवास करता येईल. या बस प्रामुख्याने ठाणे- पुणे, दादर- पुणे, नाशिक-पुणे (शिवाजीनगर), औरंगाबाद-पुणे आणि कोल्हापूर- पुणे (स्वारगेट) मार्गावर चालविण्यात येणार आहेत.

Back to top button