ICICI बँकेचा ग्राहकांना मोठा दणका! अनेक नियमांमध्ये मोठे बदल | पुढारी

ICICI बँकेचा ग्राहकांना मोठा दणका! अनेक नियमांमध्ये मोठे बदल

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICICI बँक आता पुढील महिन्यापासून एटीएम आणि रोकड काढण्याच्या नियमांमध्ये बदल करणार आहे. एटीएममधून पैसे काढण्यापासून ते बँक शाखेतून पैसे काढण्यापर्यंतचे नियम बदलणार आहेत.

जर तुमचेही ICICI बँकेत खाते असेल तर तुम्हाला या नियमांची काळजी घ्यावी लागेल. बर्‍याच व्यवहारांवर बँकेने मर्यादा निश्चित केली आहे.

अशा परिस्थितीत आपण मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार केल्यास आपणास फी द्यावी लागणार आहे.

आपल्याला प्रथम नियमांबद्दल देखील माहिती असणे आवश्यक आहे. अन्यथा आपल्याला शुल्क भरावे लागू शकते. चला तर मग जाणून घ्या आयसीआयसीआय बँकेच्या त्या नियमांबद्दल जे पुढील महिन्यापासून बदलले जातील…

एटीएमचे नियम

ज्यांचे ICICI बँकेत खाते आहे, ते इतर बँकेच्या एटीएममधून केवळ तीन वेळा व्यवहार करू शकतील. त्यानंतर त्यांना फी भरावी लागेल. हे नियम फक्त मुंबई, नवी दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबादमध्ये लागू होतील.

अन्य शहरांमधील पहिले पाच व्यवहार विनामूल्य असतील. त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारासाठी २० रुपये फी द्यावी लागेल.  गैर-आर्थिक व्यवहारांवर, प्रत्येक व्यवहारासाठी साडे आठ रुपये द्यावे लागतील.

बँकेतून पैसे काढण्याचे नियम

तुम्ही आयसीआयसीआय बँकेतून दरमहा चार व्यवहार करू शकणार आहात. जर कोणी चारपेक्षा जास्त वेळा पैसे काढले तर त्याला एकाच वेळेच्या व्यवहारानुसार १५० रुपये द्यावे लागतील. म्हणजेच बँकेतून पैसे काढताना प्रत्येक व्यवहारावर १५० रुपये द्यावे लागतील.

आयसीआयसीआय बँकेने दरमहा एक लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार निश्चित केले आहेत. यानंतर त्यांना पैसे काढताना शुल्क भरावे लागेल.

थर्ड पार्टी व्यवहारांसाठी

थर्ड पार्टी व्यवहारांसाठी दिवसाला २५ हजार रुपये निश्चित केले आहेत. त्यापेक्षा जास्त व्यवहार करता येणार नाही.

वेतन खातेधारकांसाठी स्वतंत्र नियम

वेतन खातेधारकांनाही दरमहा चार व्यवहारांसाठी सूट देण्यात आली आहे. यानंतर बँक आपल्या ग्राहकांकडून ५ रुपये प्रती हजार रुपयांच्या हिशेबाने द्यावे लागतील.

चेक बुकसाठी विशेष नियम

दरवर्षी केवळ २५ धनादेश बँकेमार्फत ग्राहकांना दिले जातील. त्याची मर्यादा वाढविल्यानंतर बँकांना १० चेकच्या चेक बुकसाठी २० रुपये द्यावे लागतील.

Back to top button