रायगड : धक्कादायक! पायातील बूट चाटायला लावलं?, पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल | पुढारी

रायगड : धक्कादायक! पायातील बूट चाटायला लावलं?, पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल

पनवेल ; पुढारी वृत्‍तसेवा : कळंबोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील यांच्यावर एका पीडित व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ आणि अन्य कारणांसाठी ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

एक पीडित व्यक्‍ती त्‍याला झालेल्या मारहाणीची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आली होती. यावेळी त्याला योग्य न्याय देण्याऐवजी जातीवाचक शिवीगाळ, तोंडावर थुंकणे आणि पायातील बूट चाटायला लावणे या आणि अन्य कारणांसाठी पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित व्यक्तीने आपल्याला पोलीस ठाण्यात योग्य वागणूक दिली नसल्याचा आरोप केला होता. त्याच अनुषंगाने पोलिसांनी दिनेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button