Psychology of Money : ही पुस्तके भारतीयांच्या पसंतीस का उतरत आहे? | पुढारी

Psychology of Money : ही पुस्तके भारतीयांच्या पसंतीस का उतरत आहे?

पुढारी ऑनलाइन डेस्क : Psychology of Money हे पुस्तक सलग दुस-या वर्षी ॲमेझॉन इंडियाच्या बेस्टसेलिंग बुकच्या सर्व प्रकारच्या कॅटेगरीतील टॉप 5 पुस्तकांच्या यादीत आहे. पुस्तकाचे लेखक मॉर्गन हौसेल यांनी स्वतःच लिंक डिनवर याची माहिती दिली आहे. मॉर्गन हौसेल यांनी लिहिले आहे, ”Psychology of Money was the bestselling book on Amazon India, all categories, for the second year in a row. Thanks for reading! 🇮🇳” अशा शब्दांत त्यांनी भारतीयांना पुस्तकाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद दिले आहेत.

जीवनात प्रत्येकाचं स्वप्न असतं, सुंदर बंगला असावा, आलिशान गाडी असावी, वर्षातून दोन तीन वेळा विमानाने विदेश प्रवास करावा, हायक्लास लाइफस्टाइल जगावे. पण या सगळ्यासाठी आवश्यक असतो तो पैसा. म्हणूनच आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आयुष्यात जास्तीत जास्त पैसे कमावण्याची प्रत्येकाची धडपड असते. तुमची ही धडपड कमी करण्यात आणि धनाढ्य होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी Psychology of Money हे पुस्तक तुमची मदत करू शकते.

या पुस्तकात कोणतीही पैसा कसा कमावावा याची कोणतीही थेअरी मांडलेली नाही, किंवा तुम्हाला सल्ले दिलेले नाहीत. तर लोक पैसा कमावण्यासाठी कशा प्रकारचे निर्णय त्यांच्या जीवनात घेतात. याचे मानसशास्त्र ते वेगवेगळ्या 19 लघुकथांद्वारे शेअर करतात. या लघुकथांमधील पात्र, सतत पैशांबद्दल विचार करतात आणि धनाढ्य होण्यासाठी सतत अशा विचित्र पद्धतींचा शोध घेतात. या कथांमधून तुम्हाला आयुष्यातील सर्वात महत्वाच्या गोष्टींपैकी एक काय आहे याची समज तुमच्यात विकसित करण्याचा लेखकाचा प्रयत्न आहे.
Psychology of Money हे पुस्तक ॲमेझॉनच्या बेस्टसेलर पुस्तकाच्या टॉप 5 यादीत तिस-या स्थानावर आहे. याला वाचकांनी साडेचार स्टार 45,390 जणांनी रेटिंग दिले आहे.

Psychology of Money या पुस्तकाची प्रत्येक कथा यातील पात्र, पैशांच्या बाबतीत निर्णय घेताना प्रत्यक्ष मार्केट, गणित आणि वास्तविक व्यावहारिक निर्णय घेण्याऐवजी, अनेकदा भावनिक होऊन किंवा सकाळी नाश्ताच्या टेबलवर चर्चा करून कशा प्रकारे निर्णय घेतात. हे या पुस्तकात त्या पात्रांच्या कथानकांच्या माध्यमातून सांगितले आहे.

या पुस्तकाचे सर्वात जास्त चांगले वैशिष्ट्य असे आहे की यात कोणतीही किचकट अवघड थेअरी मांडलेली नाही. तर वास्तवाशी जवळीक सांगणा-या पात्रांच्या आयुष्यातील कथानकांमधून विचार करण्यास शिकवते. त्यामुळेच हे पुस्तक भारतात विशेष करून तरुणांच्या पसंतीस उतरत आहे. वाचकांनी याचे रिव्ह्युव मांडताना अनेक गोष्टी या पुस्तकातून शिकता आल्या असे म्हटले आहे.

Psychology of Money या व्यतिरक्त व्यावसायिक अश्निर ग्रोवरचे दोगलापण हे पुस्तक ॲमेझॉन बेस्ट सेलरच्या टॉप 5 यादीत पहिल्या स्थानावर आहे. दुस-या क्रमांकावर एनरजाइज युवर माइंड गौर गोपाल दास यांचे पुस्तक आहेत. जेम्स क्लिअर यांचे ऑटोमिक हॅबिट्स आणि हेक्टर ग्रासिया यांचे इकिगाइ – दीर्घ आणि आनंदी आयुष्याचे जपानी लोकांचे रहस्य ही पुस्तके अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहे.

हे ही वाचा

चंद्रपूर : एका माणसाचा बळी घेणारा ‘तो’ वाघ अखेर जेरबंद

Foreign universities in India हावर्ड, ऑक्सफर्डचे शिक्षण भारतातच : परदेशी विद्यापीठांचे भारत आगमन लवकरच

Back to top button