424 कोटींची लॉटरी; पण पठ्ठ्याने सांगितलेच नाही!

424 कोटींची लॉटरी; पण पठ्ठ्याने सांगितलेच नाही!

कॅलिफोर्निया : आपल्या मुलांनी आयुष्यात काही तरी वेगळे करावे, ते सुखासमाधानात रहावेत, ही प्रत्येक पालकाची सुप्त इच्छा असते. त्यांच्यासाठी पुरेसे पैसे हाताशी असतील तर पालकांनाही काळजी असत नाही. पण, कॅलिफोर्नियातील एक पराक्रमी महाभाग असाही आहे, ज्याने 424 कोटींची लॉटरी जिंकल्यानंतर देखील याचा घरी अगदी थांगपत्ताही लागू दिला नाही.

डेली स्टारने दिलेल्या एका वृत्तानुसार, कॅलिफोर्नियाच्या या अवलियाने 10 वर्षांपूर्वीच ही लॉटरी जिंकली होती. पण, त्याने याबाबत कुटुंबातील कोणालाही मागमूस देखील लागू दिला नाही. इतकी प्रचंड संपत्ती मिळाल्यानंतरही त्याने आपल्यासाठी फक्त एक ट्रक व घर खरेदी केले, जेणेकरून कोणालाही याची शंका येणार नाही. आजही या पठ्ठ्याच्या बँक खात्यात कोट्यवधी रुपये आहेत. पण, तरीही त्याचे कुटुंब अतिशय साधेपणाने रहात आहे.

आता या लॉटरीची घरी कल्पना का दिली नाही, त्याचाही उलगडा त्याने केला. यातील एकही पैसा आपल्याला बहिणीला द्यायचा नाही. त्यामुळे आपण असे केले असे तो म्हणतो. पण, जिथे स्वत:ही त्या पैशाचा उपभोग घ्यायचा नाही आणि दुसर्‍या कोणालाही त्यात वाटा द्यायचा नाही, या दुहेरी नीतीने आपण काय साध्य करतो आहोत, याचे उत्तर सध्या त्याच्याकडेही नाही!

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news