Winter Session : 'महाराष्ट्राला धोका... मंत्र्यांना खोका'; विधानभवन परिसरात विरोधकांची जोरदार घोषणाबाजी | पुढारी

Winter Session : 'महाराष्ट्राला धोका... मंत्र्यांना खोका'; विधानभवन परिसरात विरोधकांची जोरदार घोषणाबाजी

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : Winter Session : राजीनामा द्या, राजीनामा द्या.. भ्रष्ट मंत्री राजीनामा द्या, विदर्भ हैराण, सत्ताधारी खातो गायरान, खाऊन खाऊन ५० खोके.. माजले बोके, माजले बोके अशा हाती खोके आणि बोके घेऊन घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी सत्ताधाऱ्यां विरोधात जोरदार निदर्शने केली.
Winter Session : विधीमंडळाचे अधिवेशन अंतिम टप्प्यात असताना आंदोलने जोरात आहेत. काल संत्री तर आज खाली खोके हातात घेऊन विरोधकांनी हकालपट्टी करा, हकालपट्टी करा.. खोकेवाल्यांची हकालपट्टी करा.. म्हणत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. आमदारांनी हातात टेलीबर्डचे बोके व खाली खोके हातात घेऊन सरकारचा निषेध केला.
विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील चौथ्या दिवसाचे कामकाज सुरू होताच आजही विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक सूर आळवला. हकालपट्टी करा, हकालपट्टी करा.. भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी करा, शेतकऱ्यांना धोका, मंत्र्यांना खोका.. विदर्भाला धोका, मंत्र्यांना खोका, महाराष्ट्राला धोका… मंत्र्यांना खोका, शेतकरी हैराण, सरकार खातो गायरान, सीमावासी हैराण.. सरकार खातो गायरान या घोषणांनी विरोधकांनी विधानभवन परिसर दणाणून सोडला.
Winter Session : या आंदोलनात विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, नाना पटोले, रोहित पवार, यशोमती ठाकूर, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड भास्कर जाधव, सचिन अहीर, विकास ठाकरे यांच्यासह सर्व विरोधी पक्षाचे आमदार सहभागी झाले होते.
महाराष्ट्रासाठी खोके नवीन नाही. गाव, वाडे, तांडे इथपर्यंत खोके पोहोचले आहेत. बैलपोळ्यामध्ये बैलांच्या झोळीवर देखील खोके होते. सभागृहातील या बोक्यांनी खोके खाल्ले आणि माजले देखील. हे आम्ही खोके आणि बोके घेऊन प्रतिकात्मक आंदोलन केले आहे.
-अंबादास दानवे, शिवसेना (ठाकरे गट) नेते, विधान परिषद Winter Session

हे ही वाचा :

Back to top button