Jason Behrendorff : ‘मुंबई इंडियन्स’च्या ताफ्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज दाखल | पुढारी

Jason Behrendorff : 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई इंडियन्सकडून आयपीएल २०२३ ची जोरदार तयारी सुरु केली आहे. मुंबईच्या संघाने ताफ्यात ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाचा समावेश केला आहे. जेसन बेहरनडॉर्फ असे संघात समावेश करण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचे नाव आहे. तीन वर्षांपूर्वी जेसन बेहरनडॉर्फ हा मुंबई इंडियन्स या संघाचा भाग होता. यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून त्याचा संघात समावेश करण्यात आला होता. यानंतर तीन वर्षांनी तो पुन्हा एकदा मुंबईसाठी खेळणार आहे. (Jason Behrendorff)

दरम्यान, मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा बेहरनडॉर्फचा संघात समावेश केला आहे. बेहरनडॉर्फ ३ वर्षानंतर मुंबईकडून खेळताना दिसेल. आयपीएल २०२२  मेगा ऑक्शनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने जेसन बेहरडॉर्फवर ७५ लाखांची बोली लावत संघात समावेश केला होता. बेहरनडॉर्फ यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांसाठी खेळला आहे. मुंबई इंडियन्सने २०१८ साली त्याचा संघात समावेश केला होता. त्यानंतर २०२० पर्यंत तो मुंबईच्या संघाचा भाग होता. (Jason Behrendorff)

बेहरनडॉर्फने ऑस्ट्रेलियाकडून १२ एकदिवसीय तर २० टी-२० सामने खेळले आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये बेहरनडॉर्फची कामगिरी दिमाखदार राहिली आहे. त्याचा इकोनॉमी रेटही ८ पेक्षा कमी आहे. जसप्रीत बुमराह आणि जोफ्रा आर्चर नंतर आता आणखी एका वेगवान गोलंदाज मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाला आहे. (Jason Behrendorff)

हेही वाचलंत का?

Back to top button