Debina Bonnerjee Baby : देबिनाच्या घरी नन्ही परिचं आगमन; कौतुकाचा वर्षाव

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्ही अभिनेत्री देबिना बनर्जी दुसऱ्यांदा आई बनली आहे. देबिना आणि तिच्या पती गुरमीत चौधरी याच्या घरी चिमुकल्या पाहूण्याचं (Debina Bonnerjee Baby) आगमन झाले आहे. यानिमित्ताने दोघां कपलने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.
अभिनेत्री देबिना बनर्जी आणि गुरमीत चौधरी यांनी त्याच्या इंन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या फोटोत गुरमीत ब्लॅक रंगाच्या शूटमध्ये तर देबिना व्हाईट रंगाच्या कपड्यात दिसतेय. देबिनाच्या हातात गुलाबी रंगाची फुगे असून ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. तर यावेळी गुरमीत तिच्या कपाळावर किस करताना दिसतोय. याच दरम्यान या फोटोच्या बाजूला ‘इट्स अ गर्ल’ असे लिहिले आहे. यावरून देबिनाने नुकतेच एका गोंडस मुलीला जन्म (Debina Bonnerjee Baby) दिल्याची माहिती मिळतेय.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी ‘या जगात आमच्या बाळाचे स्वागत आहे. आम्ही पुन्हा एकदा आई- वडील बनलो आहेत. यांचा आम्हाला खूपच आनंद झाला आहे. मात्र, यावेळी आम्हाला काही गोपनीयतेची गरज आहे कारण, आमचे बाळ प्रीमॅच्युअर काळात जन्मले आहे. यामुळे तुमचे प्रेम आणि आशीर्वादांचा वर्षाव अशाच राहू दे.’ असे लिहिले आहे. या सोशल मीडिया पोस्टनंतर देबिना आणि गुरमीत चौधरी यांचे सोशल मीडियावर चाहत्यांकडून अभिनंदन केले जात आहे.
गेल्या काही दिवसापुर्वी देबिनाने बोल्ड मॅटर्निटी फोटोशूट करून या गुडन्यूजची माहिती दिली होती. यानंतर तिला नेटकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले होते. कारण, देबिना आणि गुरमीत ३ एप्रिल २०२२ रोजी पहिल्यांदा पालक बनले होते. यानंतर सात महिन्यानंतर तिने पुन्हा तिच्या प्रेंग्नसीची माहिती देताच सोशल मीडियावर चर्चेना उधान आलं होते. देबिना आणि गुरमीतने पौराणिक टीव्ही शो ‘रामायण’ मालिकेसाठी प्रसिद्ध आहेत. या शोमध्ये सीता-रामच्या भूमिकेत दोघांनाही चांगलीच पसंती मिळाली होती. २०११ मध्ये दोघांनी लग्न केले होते.
हेही वाचलंत का?
- Urmilla Kothare : खुपच गोड❤️❤️; उर्मिलाच्या वनपीस जॅकेटनं लावलंय वेड (video)
- Jacqueline Fernandez : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला तात्पुरता दिलासा
- Ayesha Omar : सानिया मिर्जाच्या पतीचं नाव जिच्यासोबत जोडलं, ती आहे तरी कोण?
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram