Priyanka Chopra : आम्हाला दुय्यम वागणूक मिळायची... | पुढारी

Priyanka Chopra : आम्हाला दुय्यम वागणूक मिळायची...

पुढारी ऑनलाईन : बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ( Priyanka Chopra ) सध्या मुंबईत असून सध्या ती तिच्या आगामी ‘जी ले जरा’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. लवकरच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. दरम्यान, एका मुलाखतीत प्रियांका म्हणाली, माझ्या करिअरच्या सुरुवातीला महिला कलाकारांना दुय्यम वागणूक दिली जायची असे म्हणाली आहे.

सिनेमाचे शूटिंग कुठे होणार? सिनेमात कोणते कलाकार असतील, या सर्व गोष्टी पुरुष ठरवायचे. सुदैवाने आता हे चित्र बदलत चालले आहे. महिलांना त्यांचे हक्क मिळायलाच हवेत. प्रियांकाच्या ‘जी ले जरा’ या सिनेमात बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत. फरहान अख्तर या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. ‘जी ले जरा’ हा सिनेमा तीन महिलांवर भाष्य
करणारा आहे.

हॉलीवूडमध्येही धुरळा…

प्रियांकाने हॉलीवूडमध्येही उत्तम जम बसवला आहे. तिने ‘क्वांटिको’ आणि ‘बेवॉच’ सारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले आहे. प्रियांका यापूर्वी ‘द व्हाईट टायगर’ या बॉलीवूडच्या चित्रपटात झळकली होती. त्याचबरोबर ती ‘द मॅट्रिक्स रिसरेक्शन’ या हॉलिवूड चित्रपटातही दिसली होती.

Back to top button