Dubai Hindu Temple: दुबईतील हिंदू मंदिर आजपासून दर्शनासाठी खुले, सर्व जाती-धर्मांना प्रवेश, काय आहे मंदिराचे प्रमुख आकर्षण? | पुढारी

Dubai Hindu Temple: दुबईतील हिंदू मंदिर आजपासून दर्शनासाठी खुले, सर्व जाती-धर्मांना प्रवेश, काय आहे मंदिराचे प्रमुख आकर्षण?

पुढारी ऑनलाइन डेस्क : Dubai Hindu Temple आज दस-याच्या शुभ मुहूर्तावर दुबईतील बहुचर्चित हिंदू मंदिराचे अखेर आज अधिकृतरित्या दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. युएईचे सहिष्णुता मंत्री हिज हाइनेस शेख नाहयान बिन मुबारक अल नाहयान यांच्या हस्ते या हिंदू मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. दुबईतील जेबेल अली या गावात या मंदिराचे निर्माण करण्यात आले आहे. हे मंदिर पूजा गाव म्हणून देखिल प्रसिद्ध आहे. या गावात चर्च तसेच गुरुद्वारे देखिल आहेत. मंदिरात सर्व जाती-धर्मांच्या भाविकांना प्रवेश असणार आहे.

तसे पाहता या मंदिराचे औपचारिक रित्या 1 सप्टेंबर 2022 मध्येच उद्घाटन झाले आहे. आणि आतापर्यंत हजारों भाविकांना मंदिर आतून पाहण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

Dubai Hindu Temple कसे आहे दुबईतील हिंदू मंदिर

खलीज टाइम्स ने दिलेल्या माहितीनुसार, हे मंदिर सिंधी गुरु दरबार मंदिराचाच विस्तार आहे. 2020 मध्ये 16 देवी-देवतांच्या मूर्ती स्थापन करून मंदिराचा पाया रचण्यात आला होता. पांढ-या शुभ्र संगमरवरी दगडात बांधण्यात आलेल्या या मंदिराच्या अग्रभागी अरबी आणि हिंदू ज्यामितीय सुरेख नक्षीकाम आहे. तर छतावर अनेक घंटी बांधलेल्या आहेत. मुख्य प्रार्थना कक्षात अधिकांश देवी-देवता मुख्य प्रार्थना कक्षात स्थापित केले गेले आहे. तसेच मंदिरात गुरू ग्रंथ साहिब देखिल स्थापित करण्यात आले आहे.

Dubai Hindu Temple प्रवेशासाठी क्यूआर कोड

हिंदू मंदिर प्रबंधकांनी भाविकांना प्रवेशासाठी वेबसाइटच्या माध्यमातून क्यूआर कोड ने अपॉइंटमेंट बुकिंग प्रणाली सक्रिय केली आहे. यामुळे खूप जास्त गर्दी आणि अन्य त्रास झेलावा लागणार नाही. यामुळे मंदिरात व्यवस्था आणि सामाजिक अंतर पाळता येण्यासाठी सुद्धा मदत मिळेल.

वेबसाइटनुसार, सकाळी 6.30 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले राहील. सामान्यपणे एका वेळी 100 ते 1200 भाविक दर्शन घेऊ शकतात. आज दस-याच्या मुहूर्तावर त्याच भाविकांना दर्शन मिळेल ज्यांनी 5 ऑक्टोबरपूर्वी वेबसाइटवर अधिकृत नोंदणी केली आहे.

Dubai Hindu Temple 3 डी प्रिंटेड गुलाबी कमळ आहे मंदिराचे प्रमुख आकर्षण

मंदिराची बांधणी अतिशय सुंदर असून मंदिरातील छतावर 3 डी प्रिंटेड गुलाबी कमळ हे एक मुख्य आकर्षण आहे. मंदिराच्या गुंबदावर हे कमळ पुष्प साकारण्यात आले आहे.

हे ही वाचा :

UAE : अबु धाबी येथील तयार होणा-या पहिल्या हिंदू मंदिराला परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची भेट

राम मंदिर उभारणीचा खर्च वाढला, ‘ही’ आहेत कारणे…

Back to top button