सातारा-पंढरपूर महामार्गावरील भीषण अपघातात ३ तरुण ठार

गोंदवले अपघात
गोंदवले अपघात
Published on
Updated on

वरकुटे, मलवडी; पुढारी वृत्तसेवा : सातारा – पंढरपूर महामार्गावरील गोंदवले खुर्द येथील घोडके वस्ती परिसरात दुचाकी व  कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. दोन जण गंभीर जखमी झाले. तर कारमधील चिमुरडा सुदैवाने बचावला. ही दुर्घटना आज (दि.२) दुपारी दीडच्या सुमारास घडली. तिन्ही मृत युवक पळशी (ता. माण) येथील आहेत.

दुचाकी आणि कारची  समोरासमोर धडक

याबाबत घटनास्थळावरुन समजलेली अधिक माहिती अशी की, आज ( दि. २) दुपारी दीडच्या सुमारास माण तालुक्यातील गोंदवले खुर्द येथील घोडके वस्ती परिसरात दुचाकी (बुलेट) व स्विप्ट (एम.एच.०५ व्ही. ९६९५) या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली.
या धडकेत बुलेटवरील तुषार लक्ष्मण खाडे (वय २२), अजित विजयकुमार खाडे (वय २३), तर महेंद्र शंकर गौड (वय २१) यांचा जागीच मृत्यू झाला. तर स्विप्ट चालक गणेश आनंदराव ढेंबरे (वय २८ ) व त्यांच्या बाजुला बसलेले आनंदराव ढेंबरे (वय ६१) हे गंभीर जखमी झाले. जखमींना दहिवडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

स्विप्टमध्ये चालक गणेश यांचा मुलगा (वय ५) हा आहे. तर या अपघाताच्या धडकेत बुलेट वरील एकजण उडून समोरुन येणाऱ्या क्रुजर गाडीच्या काचेवर जाऊन पडल्याने क्रुजर (एम.एच. १३ ए.सी. १७४९) च्या समोरील काचेचा चुराडा झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, सुमारे ३०० फूट बुलेट विरुध्द दिशेला फरफटत गेली. घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी उसळली होती. तर अपघाताची माहिती देवुनही दहिवडी पोलीस १ तासाने घटनास्थळावर पोहोचल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. अपघात ठिकाणी वेगप्रतिबंधक उपाययोजना तातडीने राबवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

अपघातातील जखमी आनंदराव ढेंबरे हे ठाणे पोलीस दलातून सेवामुक्त झाले आहेत. तर त्यांचा मुलगा गणेश हा गावी दिडवाघवाडी येथे आपल्या पत्नी व मुलासह रहावयास आहे. त्यांची पत्नी ही त्यांच्या माहेरी पिंपरी चिचवडला असल्यामुळे हे पितापुत्र त्यांना भेटून गावी दिडवाघवाडीला परतत होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news