commonwealth game 2022 : 'सुवर्ण' कामगिरीमुळे भारत पदतालिकेत सहाव्या स्थानी, सहा पदके नावावर | पुढारी

commonwealth game 2022 : 'सुवर्ण' कामगिरीमुळे भारत पदतालिकेत सहाव्या स्थानी, सहा पदके नावावर

पुढारी ऑनलाइन डेस्क : अंचिता शेऊली याने वेटलिफ्टिंगमध्ये केलेल्या सुवर्ण कामगिरी नंतर भारताने आतापर्यंत तीन सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. तर दोन रौप्य आणि एक कांस्य पदक असे एकूण 6 पदक मिळाले आहे. या पदकांसह भारत पदतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे. लवकरच भारत टॉप 5 मध्ये येऊ शकतो.

हे आहे राष्ट्रकुलमधील ‘गोल्डन’ अचिवर

  1. मीराबाई चानू : राष्ट्रकुल स्पर्धेच्या दुस-या दिवशी भारताने खाते उघडले विशेष म्हणजे या दिवशी भारताने सुवर्ण रौप्य आणि कांस्य अशा तिन्ही पदकांची कमाई केली. वेटलिफ्टर मीराबाई चानू हीने 201 किलोचे वजन उचलून भारताला पहिले सुवर्ण मिळवून दिले.
  2. जेरेमी लालरिनुंगा : जेरेमीने 67 किलोग्राम वजन गटात 300 किलोग्राम वजन उचलून भारताला सुवर्ण मिळवून दिले. त्यांनी पहिल्या स्नैच राऊंडमध्ये 140 किलो वजन तर क्लीन एंड जर्क राउंडमध्ये 160 वजन उचलले. देशाला सुवर्ण मिळवून देण्यामध्ये जेरेमी पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे.  विशेष म्हणजे खेळादरम्यान ते थोडे जखमी झाले होते. मात्र, तरीही त्यांनी प्रयास सोडले नाही आणि सुवर्ण पदक उचलले. जेरेमीला पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांनी शुभेच्छा दिल्या.
  3. वेटलिफ्टिंगमध्ये अंचिता शेऊलीने सुवर्ण पदक पटकावत भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्ण पदक खेचून आणले आहे. बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर अंचिता शेउली याने 313 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले.

 

तत्पुर्वी भारताने राष्ट्रकुल स्पर्धेच्या दुस-या दिवशी वेटलिफ्टिंग स्पर्धेत संकेत सरगरने रौप्य पदक पटकावून भारताचे खाते उघडले. 55 किलो पुरुष गटात त्याने ही कामगिरी केली. सुवर्ण थोडक्यात हुकले. मात्र त्याची कामगिरी महत्वाची ठरली. तर महिला गटात बिंदिया राणी ने आश्चर्यकारक कामगिरी करत 55 किलो वजन गटात रौप्य पदक मिळवले. तर गुरुराज याने 61 किलो वजन गटात 269 किलो वजन उचलून कांस्यपदक प्राप्त केले.

भारताला आतापर्यंत तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि 1 कांस्य पदक मिळाले आहेत. यामुळे भारत हा पदतालिकेत 6 व्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक पदके ऑस्ट्रेलियाने पटकावली आहे.

 

Back to top button