काबूल ः वृत्तसंस्था उत्तर अफगाणिस्तानात एक मिनी बस दरीत कोसळून 9 मुले आणि 12 महिलांसह 25 जणांचा मृत्यू झाला. हा अपघात सर-ए-पूल प्रातांतील पर्वतराजीत घडला. अपघातग्रस्त एका लग्नसोहळा आटोपून परतत होते. हा अपघात बसचालकाच्या चुकीने झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. अफगाणिस्तानात सातत्याने अपघात होत असून खराब रस्ते त्याला कारणीभूत असल्याचे पोलिसांनी सांगितले. तालिबान राजवटीत सुरक्षा व्यवस्था विस्कळीत असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी बदख्शान प्रांताचे डेप्युटी गव्हर्नर मौलवी निसार अहमदी यांचा फैजाबादमध्ये बॉम्बस्फोटात मृत्यू झाला होता.