गरिबीच्या सर्व आयामांचा समावेश करणाऱ्या महत्त्वपूर्ण उपक्रमांमुळे गेल्या ९ वर्षांत २४.८२ कोटी व्यक्ती विविध प्रकारच्या दारिद्र्यातून बाहेर पडल्या आहेत. परिणामी, भारत २०३० दारिद्र्य निम्मे करण्याचे शाश्वत विकास उद्दिष्ट गाठण्याची शक्यता आहे. राज्यांचे कार्यप्रदर्शन बदलत असले तरी, काही राज्यांनी वर्षानुवर्षे दारिद्र्यात असणाऱ्या लोकांना दारिद्रयमुक्त करण्याच्या प्रयत्नात उल्लेखनीय प्रगती केली आहे, त्यामुळे बहुआयामी दारिद्रयातील आंतर-राज्य असमानता कमी झाली आहे. यासह, मूलभूत सेवांच्या उपलब्धतेमधील मूलभूत समस्या जलद गतीने सोडवल्या जात आहेत.