सरकार पडणार नाही, काँग्रेस शिवसेनेच्या पाठीशी : प्रणिती शिंदे

प्रणिती शिंदे
प्रणिती शिंदे
Published on
Updated on

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडणार असे चित्र तयार झाले असले तरी सरकार पडणार नाही. काँग्रेस पक्ष शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार असल्याची खात्री आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्‍त केली आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्या कार्यावर आधारित समंजस, संवाद या ग्रथांचे प्रकाशन शुक्रवारी डॉ.निर्मलकुमार फडकुले सभागृहात करण्यात आले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सध्याच्या राजकीय घडामोडींवर मत व्यक्त केले.

आ. शिंदे म्हणाल्या, महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबत ठामपणे पाठीशी आहेत. सध्या गटनेतेपदाची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत राज्यपाल किंवा राष्ट्रपती राजवटीचा विचार करू शकणार नाहीत. काँग्रेस गेल्या अडीच वर्षांपासून महाआघाडीचा धर्म पाळत आली आहे. त्याअनुषंगाने संकटाला सामना करीत असलेल्या शिवसेनेला आमची साथ असेल.

दरम्यान, नाना पटोले यांनी अजित पवारांवर निधी देण्यावरून आरोप केले होते. यावर आ. प्रणिती शिंदे यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी सावध भूमिका घेतली. मी भांडून निधी आणला आहे आणि यापुढेही निधी आणण्याची माझ्यात ताकद आहे, असे सांगून त्यांनी काँग्रेसची बाजू सांभाळून घेतली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news