सोलापूरच्या संग्रहालयातील अतिरिक्त 77 प्राणी सह्याद्री पट्ट्यात सोडणार
सोलापूरच्या संग्रहालयातील अतिरिक्त 77 प्राणी सह्याद्री पट्ट्यात सोडणार

सोलापूरच्या संग्रहालयातील अतिरिक्त 77 प्राणी सह्याद्री पट्ट्यात सोडणार

Published on

सोलापूर ः वेणुगोपाळ गाडी  सोलापूरच्या महात्मा गांधी प्राणीसंग्रहालयात काही प्राणी क्षमतेपेक्षा अतिरिक्त झाले आहेत. त्यामुळे येथील 77 अतिरिक्त वन्यप्राणी वनखात्याच्या परवानगीनंतर सह्याद्री पर्वतरांगेत सोडण्यात येणार आहेत, असे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले. यामध्ये मगर, चितळ, काळवीट, सांबर अशा प्राण्यांचा समावेश आहे, असे ते म्हणाले.

शिवशंकर म्हणाले, येथील विजापूर रस्त्यावर महापालिकेचे महात्मा गांधी प्राणी संग्रहालय आहे. तेथे प्रजनाने पिंजर्‍यांच्या क्षमतेपेक्षा प्राण्यांची संख्या अधिक झाली आहे. त्यामुळे महापालिकेपुढे अतिरिक्त प्राण्यांचे काय करावयाचे, असा प्रश्न होता. याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले होते. ते म्हणाले, या अनुंषंगाने राज्य शासनाच्या वन विभागाच्या अधिकार्‍यांनी पशुपक्षी-प्राण्यांच्या गणनेसाठी प्राणीसंग्रहालयाला भेट दिली होती. त्यावेळी अतिरिक्त वन्य प्राणी आणि त्यांची गैरसोय होत असल्याचा विषय ऐरणीवर आला. याबाबत अनेक पर्याय सुचविण्यात आले.

शिवशंकर म्हणाले, अखेर वन खात्याने हे प्राणी सह्याद्री पर्वतरांगांच्या पट्ट्यात सोडण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भात राज्याचे प्रधान वनसंरक्षक सुनील लिमये यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकही घेतली होती. या बैठकीनंतर आता वन खात्याच्या मान्यतेची औपचारिकता बाकी आहे. लवकरच मान्यता मिळताच वन विभागाकडून अतिरिक्त 77 प्राणी सह्याद्री पट्ट्यात सोडण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

सध्या 177 पशु-प्राणी

मनपाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विश्वनाथ गोरे म्हणाले, महात्मा गांधी प्राणीसंग्रहालयात सध्या 137 पशु-प्राणी आहेत. यामध्ये 3 मोर, 69 चितळ, 19 काळवीट, 12 सांबर हरण, 8 बोनेट माक, 6 रेसेस माकड, 4 बिबट्या, 16 मगरींचा समावेश आहे. एकंदर 77 प्राणी सह्याद्री पर्वतरांगेत सोडल्यानंतर अतिरिक्त प्राण्यांच्या प्रश्न लवकरच सुटण्याच्या मार्गावर आहे. शासनाकडून मान्यत मिळताच याची अंमलबजावणी होणार आहे.

मगर, चितळ, काळवीट, सांबर अतिरिक्त

प्राणीसंग्रहालयातील 77 अतिरिक्त प्राण्यांमध्ये 9 मगर, 51 चितळ, 15 काळवीट, 2 सांबरांचा समावेश आहे. राज्य शासनाच्या मान्यतेनंतर या सर्व प्राण्यांना प्राणीसंग्रहालयातून मुक्त करून सह्याद्री पट्ट्यातील नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news