इन्फोसिसच्या ‘सीईओ’चा पगार ‘इतका’ वाढला की, आकडा पाहून तुम्हालाही धक्का बसेल | पुढारी

इन्फोसिसच्या 'सीईओ'चा पगार 'इतका' वाढला की, आकडा पाहून तुम्हालाही धक्का बसेल

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : देशातील दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या आयटी कंपनीचे अर्थात इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सलील पारेख यांच्या पगारात एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर तब्बल ८८ टक्क्यांनी वाढ झालेली आहे. कंपनीच्या वार्षिक अहवालानुसार पारेख यांचा वार्षिक पगार ४२ कोटींवरून तब्बल ७९ कोटींवर पोहोचला आहे. या पगारवाढीमुळे देशातील सर्वात जास्त पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या यादीत सलील पारेख यांच्या नावाची नोंद झालेली आहे.

ही पगारवाढ करताना कंपनीने म्हटलं आहे की, “सलील पारेख यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने चांगलं काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या पगारात घसघशीत वाढ केलेली आहे.” २०१८ पासून सलील पारेख हे इन्फोसिस कंपनीमध्ये काम करत आहेत. ज्यावेळी ते कंपनीत जाॅईन झाले, त्यावेळी इन्फोसिसची व्हॅल्यू ही ७० हजार ५२२ कोटी इतकी होती. आता २०२२ मध्ये कंपनीची व्हॅल्यू तब्बल १ लाख २१ हजार ६४१ कोटींपर्यंत पोहोचली आहे.

सलील पारेख यांच्या कामावर खूश होऊन इन्फोसिसने त्यांच्या पगारात ७७-६६ टक्क्यांनी पगार वाढ केलेली आहे. त्यामुळे सलील यांचा पगार हा देशातील प्रथम क्रमांक असणाऱ्या टीसीएस आयटी कंपनीचे सीईओ राजेश गोपीनाथन यांच्या पगारापेक्षा जास्त झाला आहे. सध्या गोपीनाथन यांचा पगार २६.६ टक्क्यांनी वाढून २५.७७ कोटी झाला आहे. पारेख यांचा एकूण अनुभव हा ३० वर्षांचा आहे. यापूर्वी त्यांनी कॅपजेमिनी या कंपनीमध्ये २५ वर्षे काम केलेले आहे.

पहा व्हिडीओ : कोल्हापुरातील माऊली रथ नेते गरजूंपर्यंत जेवण

Back to top button