Mumbai Fire | कांदिवलीतील वीणा संतूर इमारतीला आग; २ ठार, ३ जखमी

वीणा संतूर इमारतीला भीषण आग
वीणा संतूर इमारतीला भीषण आग

मुंबई ; पुढारी वृत्‍तसेवा, कांदिवली पश्चिम येथील महावीर नगर येथील पवनधाम वीणा संतूर इमारतीला आज लागलेल्या आगीत २ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या ८ गाड्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. (Mumbai Fire) ही आग भीषण आहे. या आगीने कांदिवली पश्चिम भागात धुराचे लोट पसरले आहेत. (Mumbai Fire)

मुंबईतील कांदिवली येथील आठ मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागली. या आगीत दोघांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. ही घटना कांदिवली पश्चिम येथील महावीर नगर परिसरातील पवनधाम वीणा संतूर इमारतीत दुपारी १२.३० च्या सुमारास घडली.

या घटनेत एकूण ५ जण जखमी झाले. त्यांना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यापैकी दोघांना मृत घोषित करण्यात आले. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. (Mumbai Fire)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news