Building Collapsed : भिवंडीत इमारत कोसळून 2 ठार, 5 जण जखमी

भिवंडीत इमारत कोसळली
भिवंडीत इमारत कोसळली
Published on
Updated on

ठाणे : पुढारी वृत्तसेवा भिवंडीत दर्गा रोड या ठिकाणी (शनिवार) मध्यरात्री एक मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला, तर 5 व्यक्ती जखमी झाल्या आहेत. इमारत कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखाली 7 रहिवासी अडकले गेले. दुर्घटनेची माहिती समजताच ठाणे आपत्ती व्यवस्थापनाची टीम, भिवंडी अग्निशमन विभागाच्या जवानांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले.

इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सर्व लोकांना बाहेर काढण्यात आले असून, पहाटे ३:३० वाजण्याच्या सुमारास संपूर्ण बचावकार्य थांबविण्यात आले असे भिवंडी अग्निशमन दलाच्या जवानांनी माहिती दिली.

मृतांमध्ये एक 8 महिन्यांच्या मुलीचा समावेश असुन, जखमींमध्ये 3 आणि 7 वर्षांच्या मुलींचा समावेश आहे. तर एकूण मृत आणि जखमींमध्ये केवळ एका पुरुषाचा तर बाकी सर्व महिला आहेत. जखमींना भिवंडी येथील अल मोईन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जखमींपैकी 3 वर्षांची उरुसा अतिफ मोमीन हिच्यावर आय. जी. एम. रुग्णालय, भिवंडी येथे उपचार सुरू होते, प्रकृती स्थिर असल्याने घरी सोडण्यात आले.

मृत व्यक्तींची नावे

१) श्रीमती उझमा आतिफ मोमीन (स्त्री : वय ४० वर्षे)
२) कुमारी तस्लिमा मौसर मोमीन (स्त्री : वय ८ महिने)
जखमी व्यक्तींची नावे
१) मोमिन लतीफ़ (पु/ वय ६५ वर्षे)
२)श्रीमती फरझाना अब्दुल लतीफ (स्त्री / वय ५० वर्षे)
३)श्रीमती बुशरा अतिफ लतिफ (स्त्री / वय ३२ वर्षे)
४) कुमारी आदिमा अतिफ मोमीन (स्त्री / वय ०७ वर्षे)
५) कुमारी उरुसा अतिफ मोमीन (स्त्री / वय ०३ वर्षे)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news