Rajasthan Election : मला तातडीने मुख्यमंत्री बनवा : सचिन पायलट | पुढारी

Rajasthan Election : मला तातडीने मुख्यमंत्री बनवा : सचिन पायलट

जयपूर, पुढारी ऑनलाईन : कोणतीही वेळ न दवडता मी राजस्थानचा मुख्यमंत्री होऊ इच्छितो. जेणे करून आगामी निवडणुकीमध्ये पक्षाच्या हातात पुन्हा सत्तानिश्चिती होईल, असे राजस्‍थानमधील काॅंग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी काँग्रेस अध्‍यक्षा साेनिया गांधी यांना सांगितले आहे. असे घडले नाही तर  काॅंग्रेस पक्षाचा पंजाब विधानसभा निवडणुकीत जसा पराभव झाला, तसाच राजस्‍थानमध्‍ये पराभव होईल. जिथे चरणजीत सिंह चन्नी यांचा मुख्यमंत्री बनविण्याचा फाॅर्म्युला नापास ठरला. तशी अवस्था राजस्थानमध्ये होईल, असा इशाराही त्‍यांनी पक्षश्रेष्‍ठींना दिला आहे.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, सचिन पायलट यांनी मागील काही आठवड्यात गांधी कुटुंबियांसोबत तीन वेळा चर्चा केली.  पुढील वर्षी २०२३ मध्ये राजस्थान विधानसभा निवडणुका होणार आहेत. पायलट म्हणाले की,” मुख्‍यमंत्री बदलाचा निर्णय तत्‍काळ घेतला नाही तर पंजाबमध्ये काॅंग्रेसची जी अवस्‍था झाली तशीच परिस्थिती पुन्हा अनुभवास मिळेल.” सचिन पायलट हे राजस्थान काॅंग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री होते. मात्र २०२० मध्ये त्यांनी काॅंग्रेस पक्षासोबत बंडखोरी केली, त्यामुळे हे दोन्हीही पदे त्यांच्या हातातून गेली.

मागील वर्षी पक्षातील अनेक दिग्गज नेत्‍यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.  असे मानले जात आहे की, राहुल गांधी यांच्या अगदी जवळचे असणारे नेत्यांपैकी सचिन पायलट हे शेवटचे नेते उरले आहेत. कारण, ज्योतिरादित्य शिंदे, जितिन प्रसाद आणि आरपीएन सिंह यांच्यासारखे नेते भाजपामध्ये सहभागी झालेले आहेत. (Rajasthan Election)

सचिन पायलट यांनी गांधी कुटुंबियांना स्पष्टपणे सांगितले आहे की, ते राजस्थानचे मुख्यमंत्री होऊ इच्छित आहेत. २०१८ मध्ये काॅंग्रेसने राजस्थानची निवडणूक जिंकली होती. तेव्हा त्यांना डावलून अशोक गहलोत यांना मुख्यमंत्री बनविण्यात आले. या घटनेनंतर २ वर्षांनंतर १८ आमदारांना घेऊन पायलट यांनी दिल्लीत पोहोचले; पण, तेव्हा त्यांची समजूत काढण्यात पक्ष श्रेष्‍ठींना यश आले हाेते.

Back to top button