पुढारी ऑनलाईन डेस्क : अॅडव्हेंचर कारच्या चाहत्यांकरीता एक खुशखबर आहे, लवकरच टोयोटा कंपनी हायलक्स अॅडव्हेंचर (Toyota Hilux Adventure) ही नवी कार लाँच करणार आहे. ही कार मार्च महिन्यात लाँच करण्यात येणार होती, पण आता कंपनीने एप्रिल किंवा मे महिन्यात लाँच करणार असल्याचे सांगितले आहे. लवकरच याचे बुकिंग सुरू करण्यात येणार आहे.
टोयोटा हायलक्स अॅडव्हेंचर या नव्या कारचे लाँचिंग करण्यात इतका वेळ का लागला याबद्दल कंपनीकडून काही सांगण्यात आले नाही. पण ऑटो एक्सपर्टच्या माहितीनूसार सेमीकंडक्टरचा तुटवडा आणि काही देशांमध्ये कोरोनाचा पुन्हा फैलाव यामुळे या लाँचिंगला पुढे ढकलण्यात आले. कोरोनाच्या प्रसारामुळे कंपनीने जपानमध्ये उत्पादन बंद ठेवावे लागले होते. सर्व कामकाज सुरळीत झाल्यानंतर जानेवारीमध्ये टोयोटा कंपनीने हायलक्स अॅडव्हेंचरचे लवकरच प्री लाँच बुकिंग सुरू केले. पण काही कालावधीनंतर हे बुकिंग पुन्हा बंद केले.
हायलक्स या पिकअपशी साधर्म्य असणाऱ्या कारचे आकर्षक असे डिझाईन आहे. टोयोटा हे गेली अनेक वर्षे भारतात अतिशय 'दणकटपणा' आणि 'कणखर' वाहनांसाठी नावाजलेले आहे. टोयोटा हायलक्समध्ये फॅार्च्यूनर मधील 2.8 लिटरचे डिझेल इंजिन पहायला मिळणार आहे. तसेच इंजिनसोबतच 6-स्पीड मॅन्युअल आणि अॅटोमेटिक गिअरबॅाक्ससह सुसज्ज असणार आहे.
टोयोटा हायलक्स 8 अॅटोमेटिक क्लाइमेट कंट्रोल (automatic climate control), पावर्ड ड्राइवर सीट (powered driver seat), 8-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम (8-inch touchscreen Infotainment System) आणि क्रूज कंट्रोल (Cruise Control) असे फिचर्सनी हे पिकअप मॅाडेल आकर्षक असेल.
सुरक्षेच्या बाबतीत बोलायचं तर ही पिकअप कार प्रवासी सुरक्षेकरिता एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि विशेष कॅमेऱ्याच्या फिचर्सनी सुसज्ज असेल. हायलक्स ही दोन व्हेरियंटमध्ये दिसून येईल. यामध्ये एलईडी हेडलॅम्प आणि मोठे हेक्सागोनल फ्रंट ग्रिल पहायला मिळेल. त्याचबरोबर फॉर्च्युनर प्रमाणेच चाके, स्टॅक्ड टेल लॅम्प आणि डबल कॅब बॉडी स्टाइलची वैशिष्ट्ये आहेत.
हेही वाचा