Suchana Seth : चार वर्षांच्या मुलाची हत्या करणाऱ्या सूचना सेठला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Suchana Seth : चार वर्षांच्या मुलाची हत्या करणाऱ्या सूचना सेठला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

पणजी; पुढारी वृत्तसेवा : स्वतःच्या चार वर्षांच्या मुलाची चिन्मयची हत्या केल्याप्रकरणी त्याची आई सूचना सेठ हिच्या न्यायालयीन कोठडीत आणखी १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. आज तिची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपली. त्यानंतर कळंगुट पोलिसांनी तिला बाल न्यायालयात हजर केले होते.

सूचना सेठ हिने ७ जानेवारीच्या रात्री सिकेरी-कांदोळी येथील हॉटेलमध्ये स्वत:च्या चार वर्षांच्या चिन्मयचा खून केला. त्यानंतर तिने मुलाचा मृतदेह बॅगमध्ये भरून गोव्यातून भाड्याच्या कारने बंगळुरुला पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, कळंगुट पोलिसांच्या सतर्कतेमुळे ती कर्नाटक पोलिसांच्या तावडीत सापडली. त्यानंतर कर्नाटक पोलिसांनी तिला अटक करून गोवा पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर तिला प्रथम म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात उभे केले. त्यावेळी म्हापसा न्यायालयाने तिला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी ठोठावली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news