१२८ वर्षे वयाच्या आजीबाई काळाच्या पडद्याआड

१२८ वर्षे वयाच्या आजीबाई काळाच्या पडद्याआड
Published on
Updated on

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेतील जोहाना माजिबुको या जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती असल्याचा दावा करण्यात येत होता. आता त्यांचे निधन झाले असून मृत्यूवेळी त्यांचे वय १२८ वर्षे होते, असे सांगितले जाते. यावर्षी मे महिन्यात त्या १२९ वा वाढदिवस साजरा करणार होत्या. ३ मार्चला त्यांचा मृत्यू झाला, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.

मागील वर्षी जोहाना माजिबुको एका मुलाखतीत म्‍हणाल्‍या होत्‍या, 'मी अजून का जिवंत आहे? माझ्या वयाच्या अनेक जीवलगांचा कधीच मृत्यू झाला आहे. मी कधी मरणार आहे? अजूनही जिवंत राहण्यात काय अर्थ आहे? एकाच जागी बसून बसून मी आता कंटाळून गेले आहे.'

एकंदरीत अत्यंत दीर्घायुष्य लाभलेल्या या आजीबाई वार्धक्याने आणि गलितगात्र अवस्थेने जीवनाला कंटाळल्या होत्या. त्यांचे वय १२८ वर्षे सांगितले जात असले तरी गिनिज बुकमध्ये त्याची अधिकृत नोंद झालेली नाही. मात्र, त्यांच्याकडील एका ओळखपत्राच्या आधारे अशी नोंद करावी अशी मागणी त्यांच्या नातेवाईकांनी केली होती. या कागदपत्राच्या आधारे असे समजते की त्यांचा जन्म 11 मे 1894 मध्ये झाला होता.त्यांना बारा भावंडे होती. त्यापैकी तीन अद्याप हयात आहेत.

सात अपत्‍ये, ५० पेक्षा अधिक नातवंडे

जोहाना माजिबुको यांचे लग्न स्टवाना माजिबुको यांच्याशी झाले व या दाम्पत्याला सात अपत्ये झाली. त्यांना 50 पेक्षा अधिक नातवंडे, परतवंडे आहेत. जोहाना यांचे शिक्षण झाले नाही. त्या घरकाम, शेतीकाम यामध्ये रमलेल्या होत्या. त्यांना आपले लहानपण आठवत असे. त्या काळी कसल्याच समस्या नव्हत्या, खाण्या-पिण्यास सकस अन्न होते, असे त्या सांगत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news