Hema Malini Asset : १२६ कोटींचा बंगला, हेमा मालिनी यांची एकुण संपत्ती किती?

Hema Malini Asset : १२६ कोटींचा बंगला, हेमा मालिनी यांची एकुण संपत्ती किती?

पुढारी ऑनलाईन डेस्क : चित्रपट अभिनेत्री हेमा मालिनी भाजपच्या तिकीटावर तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. सध्या त्या उत्तर प्रदेशातील मथुरा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. तिसऱ्यांदा मथुरेतून निवडणूक लढवत असताना त्यांनी स्वतःच्या आणि पती धर्मेंद्र यांच्या नावावर 278 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे त्यांच्या संपत्तीबाबतचा विषय सध्या चर्चेत आला आहे. (Hema Malini Asset)

मथुरेच्या खासदार हेमा मालिनी यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात एकूण 278 कोटी रुपयांची संपत्ती (Hema Malini Asset) जाहीर केली आहे. 2019 मध्ये हेमा यांनी 250 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. 2014 मध्ये त्यांच्याकडे एकूण 178 कोटी रुपयांची संपत्ती होती. अशा प्रकारे गेल्या 10 वर्षांत त्यांच्या संपत्तीत सुमारे 100 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

खासदार हेमा मालिनी यांच्या वार्षिक उत्पन्नातील चढ-उतार

अमर उजाला या वृत्तसमुहाने दिलेल्या माहितीनुसार, 2018-19 मध्ये खासदार हेमा मालिनी यांची एकूण कमाई 1.16 कोटी रुपये होती. मात्र पुढील आर्थिक वर्षात त्यांच्या कमाईत घट झाली. 2019-20 मध्ये 96.56 लाख रुपये इतकी कमाई होती. 2020-21 मध्ये, हेमा मालिनी यांची कमाई पुन्हा कमी झाली आणि ती 64.11 लाख रुपये इतकी राहिली. मात्र 2021-22 मध्ये कमाईमध्ये लक्षणीय वाढ झाली आणि ही वाढ 1.85 कोटी रुपये इतकी झाली. 2022-23 मध्ये पुन्हा 1.27 कोटी रुपयांवर घसरली.

रोख रक्कम आणि बँक खाती

चित्रपट अभिनेत्री हेमा मालिनी यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, सध्या त्यांच्याकडे 18.52 लाख रुपये रोख आहेत. त्यांच्या पतीकडे म्हणजे धर्मेंद्र यांच्याकडे ४९.१९ लाख रुपये रोख आहेत. हेमा मालिनी यांनी बँक खात्यात ९९.९३ लाख रुपये जमा केले आहेत. त्याचवेळी अभिनेता धर्मेंद्र यांच्या बँक खात्यात ३.५२ कोटी रुपये जमा आहेत.

हेमा मालिनी यांनी दिलेली इतर माहिती अशी की, 2.57 कोटी रुपये फंड, बाँड, डिबेंचर्स आणि कंपन्यांमध्ये शेअर्सच्या रूपात जमा आहेत. आणि अभिनेता धर्मेंद्र यांच्याकडे फंड, बाँड, डिबेंचर्स आणि शेअर्सच्या रूपात कंपन्यांमध्ये 4.55 कोटी रुपये जमा आहेत. हेमा मालिनी यांना ४.२८ कोटी रुपये मिळाले आहेत तर धर्मेंद्र यांना ७.१९ कोटी रुपये वैयक्तिक कर्ज किंवा ॲडव्हान्स आणि त्यांनी कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला दिलेल्या कर्जातून मिळाले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

घर आणि जमिनीसह 249 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता

हेमा मालिनी यांच्याकडे पुण्यातील खंडाळा येथे 4.11 लाख चौरस फूट बिगरशेती जमीन आहे. या जमिनीचे सध्याचे बाजारमूल्य 2.09 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. त्याचबरोबर धर्मेंद्र यांच्या नावावर ९.३६ कोटी रुपयांची बिगरशेती जमीन आहे.  111 कोटी रुपयांच्या निवासी इमारतीच्या मालक आहेत. तसेच, मुंबईतील विलेपार्ले भागात 'जुहू बंगला' आहे ज्याचे नाव धर्मेंद्र आहे. 24,000 स्क्वेअर फुटांच्या या बंगल्याची सध्याची बाजारातील किंमत 126 कोटी रुपये आहे. अशाप्रकारे, चित्रपट अभिनेत्री हेमा मालिनी यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात एकूण 249.68 कोटी रुपयांची स्थावर संपत्ती जाहीर केली आहे. जंगम आणि स्थावर दोन्ही मालमत्ता जोडल्या तर भाजप खासदाराची एकूण मालमत्ता २७८.९३ कोटी रुपये आहे. याशिवाय हेमा मालिनी यांच्या नावावर 14.22 कोटी रुपये, तर धर्मेंद्र यांच्या नावावर 6.49 कोटी रुपयांचे दायित्व आहे.

मालिनी यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत काय?

हेमा मालिनी यांनी त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत म्हणून व्यवसाय, भाडे आणि व्याज उत्पन्नाचा उल्लेख केला आहे. त्याचवेळी अभिनेता धर्मेंद्र यांनाही या स्रोतांमधून उत्पन्न मिळते असे सांगण्यात आले आहेत. चित्रपट अभिनेत्रीने 2012 मध्ये उदयपूरच्या सर पदमपत सिंघानिया विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी प्राप्त केली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news