10th-12th result | दहावी-बारावीचा आज निकाल; असा पाहता येणार निकाल

10th-12th result | दहावी-बारावीचा आज निकाल; असा पाहता येणार निकाल
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन बोर्ड अर्थात सीआयएससीई मंडळाच्या आयसीएसई म्हणजे दहावी आणि आयएससी अर्थात बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख व वेळ सीआयएससीई मंडळाकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित मंडळाच्या विद्यार्थ्यांना आज सोमवारी (दि. 6 मे) दहावी-बारावीचा निकाल सकाळी 11 वाजता पाहण्यासाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

सीआयएससीई बोर्डाचा निकाल केव्हा जाहीर होणार, याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम होता. गेल्या काही दिवसांपासून निकालाच्या खोट्या तारखा व नोटिसा सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. त्यामुळे विद्यार्थी व पालक गोंधळून गेले होते. बोर्डाने संकेतस्थळावर 6 मे रोजी निकाल जाहीर केला जाणार असल्याचे अधिकृतपणे प्रसिद्ध केले आहे. विद्यार्थ्यांना results.cisce.org किंवा cisce.org  या संकेतस्थळावर निकाल पाहण्यासाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

विद्यार्थ्यांना पेपरची पुनर्तपासणी आणि पुनर्मूल्यांकनाची सुविधा देण्यात आली आहे. दहावी-बारावीच्या पुनर्तपासणीसाठी 1 हजार रुपये शुल्क, तर दहावी-बारावीच्या पुनर्मूल्यांकनासाठी 1 हजार 500 रुपये शुल्क घेण्यात येणार असल्याचेदेखील स्पष्ट करण्यात आले आहे. सीआयएससीई बोर्डातर्फेे इयत्ता दहावीच्या परीक्षा 12 मार्चपर्यंत, तर बारावीच्या परीक्षा 3 एप्रिलपर्यंत आयोजित केल्या होत्या. परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा होती. इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी सुमारे अडीच लाख विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. मागील वर्षी 14 मे रोजी परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता. मागील वर्षी मुलांपेक्षा मुलींची निकालाची टक्केवारी अधिक होती.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news