‘आदिपुरुष’ची 10 हजार तिकिटे फ्री

आदिपुरुष
आदिपुरुष

बहुचर्चित 'आदिपुरुष' या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. रामायणावर आधारित असलेल्या या चित्रपटात प्रभास, क्रिती सेनॉन मुख्य भूमिकेत असलेला 'आदिपुरुष' सिनेमा 16 जूनला देशभरात प्रदर्शित होणार आहे.

बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्माता अभिषेक अग्रवाल या चित्रपटाची सुमारे 10 हजार तिकिटांचे मोफत वाटप करणार आहेत. याबाबतची माहिती त्यांनी ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. प्रभू रामचंद्र यांच्याप्रती असलेल्या श्रद्धेमुळे मी 'आदिपुरुष' चित्रपटाची 10 हजार तिकिटे मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. तेलंगणामधील सरकारी शाळा, अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमातील लोकांना ही तिकिटे देण्यात येतील, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांनी मोफत तिकिटासाठी गुगल फॉर्मची लिंकही ट्विटमध्ये शेअर केली आहे. ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता प्रभासने श्रीरामाची भूमिका साकारली आहे. क्रिती सेनॉन सीतेच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे याने हनुमानाची भूमिका साकारली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news