‘स्वर’ देवतेची ‘स्वरयात्रा’विसावली ! गानकोकिळा लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड

lata mangeshkar
lata mangeshkar
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाले. गेल्या २८ दिवसांपासून त्यांची प्रकृतीशी झुंज सुरु होती. त्यांची कालपासून (ता.०६) प्रकृती पुन्हा बिघडल्याने चिंताजनक झाली. काल त्यांनी उपचारांना प्रतिसाद देण्यास सुरुवात केल्याची माहिती ब्रीच कॅन्डी रुग्णालयाचे डॉ. प्रतित समदानी यांनी दिली होती. तसेच त्याला लता दीदींच्या भगिनी आणि सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनीही दुजोरा दिला होता.

दुसरीकडे रुग्णालयाच्या बाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचे निधन झाल्याचे जाहीर केले.

लतादीदींना 8 जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाल्यानंतर ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना कोरोनानंतर न्यूमोनियाचीही लागण झाली होती. गेल्या आठवड्यात त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने त्यांचे व्हेंटिलेटर तीन दिवसांपूर्वी काढण्यात आले होते. मात्र शनिवारी दुपारी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटर लावण्यात आले.

काल केंद्रीय मंत्री पियूष गोयल, लतादीदींचे बंधू आणि संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, चित्रपट निर्माते मधुर भांडारकर, मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आदींनी ब्रीच कॅन्डी रुग्णालयास भेट देऊन लतादीदींच्या प्रकृतीची डॉक्टरांकडे विचारणा केली. लता मंगेशकर  लवकरात लवकर बर्‍या व्हाव्यात असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगेशकर कुटुंबीयांना देण्यास सांगितल्याची माहिती पियूष गोयल यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी दुपारी ब्रीच कॅन्डी रुग्णालयात जाऊन मंगेशकर कुटुंबीयांची भेट घेतली. कोरोना संसर्ग होऊनही तसेच अनेक सार्वजनिक कार्यक्रमांत मास्कचा वापर न करणार्‍या राज ठाकरे यांनी रुग्णालयात जातांना मास्क लावला होता. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी देखील रुग्णालयात जाऊन लता दीदींच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि आशा भोसले यांनी देखील ब्रीच कॅन्डी येथे जाऊन डॉक्टरांशी चर्चा केल्याची माहिती देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news