कोल्हापूर : इचलकरंजीत तरुणाचा खून; ओढ्यात आढळला मृतदेह

कोल्हापूर : इचलकरंजीत तरुणाचा खून; ओढ्यात आढळला मृतदेह
Published on: 
Updated on: 

यड्राव : पुढारी वृत्तसेवा : यड्राव फाटा – पंचगंगा साखर कारखाना या मार्गावर लोटस पार्कसमोर तरुणाच्या तोंडावर व डोक्यावर वार करून मृतदेह ओढ्यातील पाण्यात टाकल्याची घटना आज (दि.३) उघडकीस आली. सुरज बबन कांबळे (वय २५, रा. रेणुकानगर झोपडपट्टी, इचलकरंजी) असे मृताचे नाव आहे.

सुरज कांबळे वहीफणी कामगार असल्याचे समजते. शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडे निनावी फोन आला होता. त्यानुसार त्याची खातरजमा केली असता खून झाल्याची निष्पन्न झाले. घटनास्थळी शहापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील व कर्मचारी वर्ग दाखल झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news