नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : अबकारी धोरणात बदल करून आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी मोठी कमाई केली असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे घोटाळ्याचे खरे सूत्रधार आहेत, असा आरोप भाजपचे प्रवक्ते संबीत पात्रा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना केला. दिल्लीतील मद्यविक्री धोरणात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी तज्ज्ञांच्या समितीने अहवाल दिला होता. मात्र त्या अहवालाला केराची टोपली दाखवतं, ज्या मद्य कंपन्यांनी कमिशन दिले, अशा कंपन्यांनाच परवाने देण्यात आल्याचा आरोप पात्रा यांनी या वेळी केला.