

पुढारी ऑनलाइन डेस्क : Kedarnath Dham : चारधाम यात्रेपैकी एक महत्वाचे तीर्थ आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले उत्तराखंड येथील केदारनाथ धामचे दरवाजे आज मंगळवारी उघडण्यात आले. केदारनाथ मंदिराचे दरवाजे पूर्ण विधीवत पूजनाने उघडण्यात आले. यावेळी मंदिराला तब्बल 20 क्विंटल फुलांनी सजवण्यात आले होते. तर मंदिर उघडताना तब्बल आठ हजार भाविकांनी गर्दी केली होती.
तसे पाहता बर्फवृष्टीमुळे आणि वातावरण खराब असल्याने सोमवारपासून भाविकांना पुढे जाऊ दिले जात नव्हते. मात्र तरीही मंगळवारी सकाळी जवळपास आठ हजार भाविक तिथे उपस्थित होते. केदारनाथ धाम आता पुढील सहा महिन्यापर्यंत दर्शनासाठी उघडे राहील.
यापूर्वी, श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी सांगितले होते की, मंगळवारी सकाळी 06:20 वाजता केदारनाथ धामचे दरवाजे दर्शनासाठी उघडले जातील. ज्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. बाबा केदार यांची पंचमुखी चाल विग्रह डोलीही सोमवार धाम येथे पोहोचली.
अजेंद्र अजय म्हणाले की, प्रचंड थंडी असूनही मंदिराचे दरवाजे उघडताना हजारो भाविक केदारनाथ धाममध्ये पोहोचले आहेत. केदारनाथ धाममध्ये अधूनमधून होणारी बर्फवृष्टी आणि पाऊस पाहता त्यांनी भाविकांना यात्रा सुरू करण्यापूर्वी राज्य सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे आणि प्रतिकूल हवामान लक्षात घेता केदारनाथ धाममध्ये निवासाची व्यवस्था अगोदरच करावी, असे आवाहनही त्यांनी केले. Kedarnath Dham
हे ही वाचा :