Palak Matar soup recipe
Palak Matar soup recipe

Palak Matar soup recipe | टेस्टी पालक-वाटाणा सूप बनवायचंय! जाणून घ्या रेसिपी

Published on

Palak Matar soup recipe : साहित्य –

2 वाट्या चिरलेला पालक, 1 वाटी वाटाणा, मीठ, 2 चमचे कॉर्नफ्लोअर, साखर चवीनुसार, अर्धे लिंबू, मिरेपूड, आलं-लसूण पेस्ट, लोणी.

कृती –

पालक-वाटाणा कुकरमध्ये 3 शिट्या देऊन उकडून घ्यावे. मिक्सरमध्ये बारीक करावा. नंतर पातेले तापवून एक चमचा लोणी घाला. आलं-लसूण पेस्ट घाला. वाटलेले साखर घालून पातळ करा आणि पातेल्यात ओता. मीठ, कॉर्नफ्लोअर घालून पेस्ट करून घ्या.

उकळत ठेवलेले मिश्रण एका हाताने हलवत राहून दुसर्‍या हाताने हळूहळू कॉर्नफ्लोअरची पेस्ट मिसळा. सतत हलवत राहा. उकळी आल्यावर गॅस बंद करून 5 मिनिटांनी अर्ध्या लिंबाचा रस पिळा. सर्व्ह करताना मिरपूड, फ्रेश क्रिम घालून सर्व्ह करा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news