

पुढारी ऑनलाइन डेस्क : Karnataka Election Result 2023 Live : कर्नाटक निवडणूक निकालाचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. 11.30 वाजेपर्यंतच्या कल चाचण्यांमध्ये काँग्रेसने 119 जागांवर निर्णायक आघाडी घेतली आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यालयात जल्लोषाचे वातावरण आहे. (Karnataka Election Results) मिळालेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार काँग्रेसने 119 जागांवर निर्णायक आघाडी घेतली असून भाजप 72 जागांवर आहे तर जेडीएस 25 जागांवर आहे. अद्ययावत माहितीनुसार धारवाडमधून काँग्रेसचे विनय कुलकर्णी विजयी झाले आहेत. तर बेळगाव उत्तर मतदारसंघातून नवव्या फेरीत काँग्रेसचे राजू शेठ ३१०७ मतांनी पुढे आहेत. पुढे निकालांचे लाइव्ह अपडेट्स दिले आहेत.
विजापूर जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात
1) विजापूर शहर मतदारसंघ
बसवनगौडा पाटील भाजप 19625 पुढे
2) इंडी मतदारसंघ
काॅंग्रेस
यशवंतरावगौडा पाटील 23464
3) सिंदगी मतदारसंघ
अशोक मनगोळी काँग्रेस 25062
4) बबलेश्वर मतदारसंघ
एम बी पाटील काॅंग्रेस 20746 पुढे
5) मुद्धेबिहाळ मतदारसंघ आप्पाजी नाडगौडा काँग्रेस 27549पुढे
6) देवरहिप्परगी मतदारसंघ
राजूगौडा पाटील निजद 16875पुढे
7) बसवनबागेवाडी मतदारसंघ
अप्पूगौडा पाटील मनगोळी निजद 11343 पुढे
8) नागठाण मतदारसंघ
विठ्ठल कटकदोड काॅंग्रेस 12875 पुढे
Karnataka Election Result 2023 Live : सुरुवातीच्या कलानुसार आतापर्यंत सुरुवातीच्या कलात आतापर्यंत 157 जागांचे कल हाती आले आहे. यामध्ये कांग्रेस 79, भाजप 63, जेडीएस 17, अन्य 1असे कल हाती आले आहेत. दरम्यान काँग्रेस भाजपमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. काँग्रेस पुढे जात आहे, असे वाटत असतानाच भाजपचाही आकडा वाढत आहे.
दरम्यान, मतमोजणीपूर्वी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. सुरक्षेबाबत डीसी बेंगळुरू अर्बन, दयानंद के.ए. यांनी म्हटले की, प्रत्येक स्ट्राँग रूम, मतमोजणी हॉल आणि मतमोजणी केंद्र परिसरात नियोजनानुसार पुरेसे पोलिस कर्मचारी तैनात आहेत. बेंगळुरूमधील माउंट कार्मेल कॉलेज आणि सेंट जोसेफ कॉलेजच्या मतमोजणी केंद्रांचे त्याची काही छायाचित्रे एएनआयने दिली आहे.
याशिवाय आज विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हुबळी येथील निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.