Kanjhawala Case : धक्कादायक! कारने अंजलीला जिथून फरफटत नेले त्याच मार्गावरून दोन मिनिटानंतर गेली होती ‘PCR Van’

Kanjhawala Case : धक्कादायक! कारने अंजलीला जिथून फरफटत नेले त्याच मार्गावरून दोन मिनिटानंतर गेली होती ‘PCR Van’
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : Kanjhawala Case : दिल्ली कंझावला येथे मुलीला कारने ज्या मार्गावरून 13 किमी फरफटत नेले त्याच मार्गावरून त्याच वेळी अवघ्या दोन मिनिटांच्या फरकाने पोलिसांची PCR Van गेली होती. तरीही पोलिसांना मुलगी कारखाली अडकली आहे हे लक्षात आले नाही, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी 18000 जवान 250 पीसीआर व्हॅन कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी तैनात केल्याचा दावा केला आहे. असे असूनही पोलिसांना अद्यापही त्या कारला ट्रेस करता आले नाही.

Kanjhawala Case : अंजली सिंह असे या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. ती इवेंट मॅनेजर होती. 31 डिसेंबरच्या रात्री सेलिब्रेशन करून आपल्या मैत्रिणीसह स्कूटीवरून घरी परत येत होती. त्यावेळी कारने तिच्या स्कूटीला टक्कर दिली. त्यामुळे तिचा पाय कारच्या अॅक्सेलमध्ये फसला त्यानंतर मुलीने स्वतःला वाचवण्यासाठी ओरडा केला मात्र कारमधील युवकांनी तिला 13 किमी फरफटत नेले. त्यांना कारमध्ये काही अडकले असेल असे वाटले. त्यांनी बाहेर पाहिले तर त्यांना मुलीचा हात दिसला. मात्र, रस्त्यावर उभ्या असलेल्या पीसीआर व्हॅनला पाहून युवकांनी कार न थांबवता पुन्हा युवती अंजलीला फरफटत नेले.

Kanjhawala Case : सूत्रांच्या माहितीनुसार पोलिसांच्या इमरजन्सी क्रमांकावर पाच ते सहा कॉल करण्यात आले. त्याचे प्रत्यक्षदर्शी दीपक दहिया यांनी पोलिसांना 20 हून अधिक कॉल केले होते. मुलगी गाडीखाली अडकल्याचे दीपकनेच पाहिले.
विशेष म्हणजे ज्या मार्गावरून ही व्हॅन गेली त्याच मार्गावरून अवघ्या दोन मिनिटांनी पोलिसांची पीसीआर व्हॅन गेली होती. याचा अर्थ कार आणि व्हॅनमध्ये एक वेळ तरी कमी अंतर असेल, असे असूनही पोलिसांना मुलगी कारमध्ये अडकली आहे, हे लक्षात आले नाही.
Kanjhawala Case : त्या 13 किमीमध्ये 4 पोलीस ठाणे, 5 पीसीआर व्हॅन होत्या

घटनेची सर्वात धक्कादायक माहिती अशी की मुलीचे शव पाडण्यासाठी कारने 4 पेक्षा जास्त वेळा यू-टर्न घेतला. यादरम्यान कार सुल्तानपुरी, अमन विहार, प्रेम नगर व कंझावला या पोलिस ठाण्याच्या हद्दीतून गेली.

Kanjhawala Case : 9 पीसीआर व्हॅननंतरही मुलगी फरफटत राहिली

अपघाताच्या १३ किलोमीटरच्या मार्गावर ५ पीसीआर व्हॅन उभ्या होत्या, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 5-6 पीसीआर कॉल करण्यात आले. पोलीस अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षदर्शी दीपकशी २० हून अधिक वेळा बोलले. त्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी एकूण 9 पीसीआर व्हॅन तैनात करण्यात आल्या होत्या आणि स्थानिक पोलीसही आरोपींचा शोध घेत होते, मात्र तरीही दिल्ली पोलिसांना आरोपींना घटनास्थळावरून पकडता आले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news