IPL 2024 MI vs DC | मुंबईचा पहिला विजय; दिल्ली 29 धावांनी पराभूत | पुढारी

IPL 2024 MI vs DC | मुंबईचा पहिला विजय; दिल्ली 29 धावांनी पराभूत

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीला पराभूत करून मुंबई इंडियन्सने या मोसमातील पहिला विजय मिळवला. आयपीएल 2024 च्या 20 व्या सामन्यात मुंबईने दिल्ली कॅपिटल्सचा 29 धावांनी पराभव केला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 20 षटकांत 5 गडी गमावून 234 धावा केल्या. एके काळी मुंबईची धावसंख्या 17 षटकांत 4 गडी बाद 167 धावा होती. यानंतर डेथ ओव्हर्समध्ये टीम डेव्हिड आणि रोमॅरियो शेफर्ड यांच्या तुफानी फलंदाजीमुळे मुंबईने मोठी धावसंख्या उभारली.

फलंदाजी करताना मुंबईने शेवटच्या पाच षटकात 96 धावा कुटल्या. रोमारियो शेफर्डने एनरिक नॉर्टजेच्या 20व्या षटकात 32 धावा वसूल केल्या. 235 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 205 धावाच करू शकला. सामन्यात शेफर्डने केलेल्या 32 धावा निर्णायक ठरल्या.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना मुंबईने दिल्लीला 235 धावांचे लक्ष्य दिले. त्यांनी 20 षटकात 5 गडी गमावून 234 धावा केल्या. रोमारियो शेफर्डने 20 व्या षटकात 32 धावा कुटल्या. ॲनरिक नॉर्टजेच्या या षटकात त्याने चार षटकार आणि दोन चौकार लगावले. शेफर्ड 10 चेंडूत 39 धावांची झंझावती खेळीकरून नाबाद राहिला. तर टीम डेव्हिडने 21 चेंडूंत दोन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 45 धावांची खेळी केली. दोघांनी 13 चेंडूत 53 धावांची भागीदारी केली. तर डावाच्या सुरूवातीला आक्रमक खेळीकरून संघाल चांगली सुरूवात करून दिली. त्याने आपल्या खेळीत 27 बॉलमध्ये 3 षटकार आणि 6 चौकारांच्या सहायय्याने 49 धावांची खेळी केली. रोहितला इशान किशनने उत्तमसाथ देत 23 बॉलमध्ये 2 षटकार आणि 4 चौकाराच्या सहाय्यने 42 धावांची खेळी केली. या दोघांना बाद करून अक्षर पटेलने मुंबईची धावगती नियंत्रणात आणली. रोहित-इशान जोडीने पहिल्या विकेटसाठी 80 धावांची भागिदारी केली. यानंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करणारा सुर्यकुमार यादव मैदानावर भोपळा न फोडता माघारी गेला. तर तिलक वर्मा 6 धावांची भर टाकून तंबूत परतला.

दिल्लीची गुणतालिकेत घसरण

पाच सामन्यांतील चौथ्या पराभवासह दिल्लीचा संघ गुणतालिकेत 10व्या स्थानावर घसरला आहे. त्याचबरोबर सलग तीन सामने गमावल्यानंतर पहिला विजय नोंदवत मुंबईचा संघ आठव्या स्थानावर पोहोचला आहे. दिल्लीचा पुढील सामना 12 एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध एकाना येथे होणार आहे. त्याचवेळी 11 एप्रिलला वानखेडेवर मुंबई संघाचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे.

Back to top button