

बिजिंग : चीनमधील पत्रकार झांग झान (वय 42) यांना कोरोना व्हायरसच्या सुरुवातीच्या काळातील माहिती प्रकाशित केल्याबद्दल विवाद उधळणे आणि गोंधळ निर्माण करणे या आरोपांखाली पुन्हा चार वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा करण्यात आली आहे. या गुन्ह्यामुळे झांगला डिसेंबर 2020 मध्येही तुरुंगवासाची शिक्षा झाली होती.
रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्सच्या मते, झांगने वुहानमधून कोरोना व्हायरसच्या सुरुवातीच्या प्रसाराची पहिली माहिती जाहीर केली होती. आंतरराष्ट्रीय समुदायाला झांगला ताबडतोब मुक्त करण्यासाठी चीनवर दबाव आणण्याचे आवाहन केले आहे.
तुरुंगात असताना झांग झानने उपोषण केले होते. त्यानंतर पोलिसांनी तिच्या हातांना बांधून ट्यूबच्या माध्यमातून जबरदस्तीने अन्न पुरवले. झांगचे पुन्हा तुरुंगवासाचे निर्णय चीनमधील मानवी हक्कांच्या उल्लंघनावर केलेल्या रिपोर्टिंगनंतर आले आहेत. तिच्या माजी वकिलाने या आरोपांना खोटे ठरवले आहे.